नेरी ग्रामपंचायतला घेराव टाकुन दि, 27-11-2021रोज शनिवारला वार्ड केर, ४,येथील नागरीकांना सोबत घेऊन प्रहार संघटना करनार नेरी ग्रामपंचायत सामोर बोंबाबोंब आंदोलन.
वार्ड नं ४ मधील रस्ता व विविध मागण्या
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविण वाघे मो, 7038115037
नेरी : - नेरी येथील गांधी वार्ड नं ४ च्या रस्त्याची खूपच नींदनीय अवस्था झाली संपूर्ण रस्ता खराब झाला असून वाहतूक करणे कठिन झाले आहे. मागील अनेक वर्षापासून अनेकदा ग्रा.प. नेरीला याबाबत तोंडी सुचना अर्ज निवेदन माहिती देऊन ही ग्रा.प. या रस्त्याकड़े झोपेचे सोंग घेऊन चक्क दुर्लक्ष करीत आहे.
नेरी येथील बौद्ध विहारा कड़े जाणारा हा महत्वपूर्ण मार्ग असून नेरी नवरगाव मार्गावर आहे . रस्त्याची दुरअवस्था झाली आहे या परिसरातील नागरिकांची जाण्यां येन्या साठी मोठी पंचायत होत आहे.नेरी येथील अनेक मार्ग सीमेंट कांक्रीट चे झाले आहे आनी होत आहे मात्र हा मार्ग जैसे थे आहे. अनेक दा माहिती देउनही ग्रा, प, नेरी यांनी हेतु परस्पर दुलक्ष करीत मध्यंतरी रस्त्याला ठीगर लावले मात्र ते ठीगर ही आता ऊखळुन गेले आहे.नेरी ग्रामपंचायत मध्ये २०२०_२०२१ नवनवीत सरपंच मेंबर बाॅडी आल्यानंतर कित्येक दा माहिती देऊन सुद्धा जानुन बुजून दुर्लक्ष करुन खोटे आश्वासने देत आहेत खरच गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ला निधी येत नसेल का. असा प्रश्न या परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.तेव्हा नेरी ग्रामपंचायत कडून ताबडतोब या रस्त्याची दखल घेऊन गावातील काही रस्ते बनविले त्याच प्रकारे हा रस्ता सुद्धा तयार करावा अशी मागणी रेटून धरत दि, 27-11-2021 रोज शनिवारला वार्ड क्र, ४ येथील महीला व पुरुष सर्वत्र नागरिक यांना सोबत घेऊन प्रहार संघटनेमार्फत शेरखान पठाण यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत नेरीला घेराव घालुन बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत ऊठनार नाही असे प्रहार संघटनेचे शेरखान पठाण व वार्डातील नागरीक यांनी सांगितले आहे.