आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य दीपोत्सव साजरा

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर भव्य दीपोत्सव  साजरा

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 8928860058



  आनंदवन च्या पवित्र भूमीवर आनंद निकेतन महाविद्यालयात रोज मंगळवारला सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव मोठ्या  आनंदा मध्ये साजरा करण्यात आला.

या दीपोत्सवाला  प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समिती वरोरा चे सचिव डॉ. विकास आमटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे,श्री नितीन मत्ते, श्री बक्षि तसेच वरोरा तालुक्यातील संपूर्ण शारीरिक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

    या दीपोत्सवाला क्रीडांगणावर असलेल्या जवळपास 23 वेगवेगळ्या खेळांच्या मैदानांवर सर्व खेळाडूंनी ऐकून 5000 दिवे प्रज्वलीत केले. याच कार्यक्रमामध्ये प्रा.रामदास साठोने ,श्री. बाबाराव आगलावे, श्री.महेश डोंगरे, प्रा.सौ.श्रीराव,सौ.खैरे,श्री.सागर कोहळे,श्री.गणेश मुसळे, श्री. लांडगे,श्री.घुलक्षे, श्री.कुंभारे, श्री.रवी चारूरकर, श्री.पिंटू चिमुरकर, श्री.स्वप्नील चौधरी, श्री. कुणाल पिदूरकर, श्री.चेतन चिंचोलकर,श्री. निमदेव उरांडे या सर्व क्रीडा व शारीरिक शिक्षक व प्रशिक्षकांचा अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. विकासभाऊ आमटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.विकास आमटे आणि प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी दीप हा खेळाडूंच्या मेहनतीचे प्रतीक आहे असे विशेषत्वाने नमूद केले तसेच उपस्थित सर्वांना दीपावली उत्सवाच्या आनंदी व आरोग्यमयी शुभेच्या दिल्या. सदर कार्यक्रमाला 350 खेळाडू, पालक व शिक्षक उपस्थित होते.  हा सर्व कार्यक्रम महाविद्यालयाचे शारीरिक  शिक्षण विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू ओमकार चट्टे याच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण खेळाडूंनी पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler