शेगाव बु येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
वरोरा : वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील रहिवासी रेश्मा नितीन श्रीरामे वय (२२) वर्ष हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली.रेश्मा व नितीन यांचा प्रेमविवाह झाला होता.ते शेगाव येथे किरायाने राहत होते.नितीन कामावरून घरी सायंकाळी परत आला तेव्हा आतून दार बंद होते. नितीन ने आत बघितले तेव्हा रेश्माने आत्महत्या केल्याचे दिसले.तिने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.तिला चार वर्षांनी लहान मुलगी आहे.पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब कांबळे, पुनम ताडे ,ठोक मेजर ,इत्यादी करत आहेत.