प्रहारचे शेरखान पठाण यांच्या उपस्थितीत अर्जुनी (तु) येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
तालुका .वरोरा .जिल्हा .चंद्रपूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा राज्यमंत्री म .रा. ना .बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराचा प्रचार होण्यासाठी म्हणजेच गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी( तू )येथे शाखा स्थापन करण्यात आली प्रहार सेवक शेरखान पठाण हे यावेळी बोलले कि प्रहार संघटना ही निव्वळ राजकारनासाठीच नाही तर गोर गरीब शेतकरी शेतमजूर अपंग बांधव यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहून अन्याय विरुद्ध वाचा फोडनारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे चंद्रपूर जिल्ह्यात बरेच ठिकाणी शाखा आहे मात्र प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा ओपन करुन गावागावात कार्यकर्ता हा प्रहार चाच राहिल आनी मी संपूर्ण जिल्हा प्रहारमय होईपर्यंत स्वस्त बसणार नाही. पठाणअसेही बोलले. यावेळी उपस्थित मान्यवर, प्रहार सेवक अमोल भाऊ दातरकर, राहुल फुलकर उपस्थित होते.
यावेळी प्रहार ती कार्यकारणी सुद्धा घोषित करण्यात आली की खालीलप्रमाणे,
तुकारामजी पोहीनकर(अध्यक्ष)
ज्ञानेश्वर भोयर(उपाध्यक्ष)
कैलास ढोक(कोषाध्यक्ष)
प्रदीप कापटे(सचिव)
दादाजी गोडारे(शेतकरी प्रमुख)
प्रीतम भेडारे(रुग्णसेवक)
मंगेश पोहीनकर(युवा प्रमुख)
इतर प्रहार सदस्य (१२)
प्रहारचे विचार जनसामान्य नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी कार्य करावे व जनतेला मदत करावी अशी अपेक्षा आपल्या कडून प्रहार जनशक्ती पक्ष करीत आहे.