गुरुदेव प्रार्थना मंदिराचे उदघाटन डॉ.सतिषभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
आज दि.११.११.२०२१ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील वाढोना येथे श्री संत तुकड्यादास महिला मंडळ यांच्या वतीने,गुरुदेव प्रार्थना मंदिराचे उदघाटन तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्थापना मूर्तीचे अनावर सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता सतिशभाऊ वारजूकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य खोजरामजी मरसकोल्हे,प्रमुख उपस्थिती सभापती पंचायत नागभीड प्रफुलभाऊ खापर्डे,पंचायत समिती सदस्य श्यामसुंदरजी पुरकाम,ग्राम पंचायत सरपंच वाढोना देवेंद्रजी गेडाम,अध्यक्ष हमारा गांव संघटना वाढोना रुपेशजी डोरलीकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष रघुनाथजी बोरकर, पोलीस पाटील अपूर्वाताई मेश्राम, अध्यक्ष अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अनिलजी डोरलीकर,कन्हाळगांव ग्राम पंचायत चे सरपंच रमेशभाऊ घुगुस्कर,बल्लूभाऊ गेटकर, गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक राजेंद्रजी गुणशिट्टीवार,तुळशीदासजी येसनसुरे,प्रदीपजी येसणसुरे,संजयजी गहाणे,कन्नमवारजी,व गावकरी मंडळी उपस्थित होते
डॉ.सतीशभाऊ वारजूकर हे वाढोना गिरगांव जिल्हा परिषद क्षेत्रामधून निवडणूक लढवली व भरगोस मतांनी जनतेनी त्यांना निवडून दिले त्यानंतर,त्यांनी गिरगांव वाढोना क्षेत्रातील अनेक गावांमध्ये विकास कामे करून जनतेचे मन जिंकून घेतले आहेत वाढोना गावामध्ये सुद्धा अनेक विकास कामे केले ,त्याच प्रमाणे मॉडेल ग्राम पंचायतचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिली व काम पूर्ण झाले त्यानंतर त्या ग्राम पंचायत इमारतीच्या लोकार्पनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असता तेथील
तुकड्यादास महिला मंडळाच्या महिलांनी सतिशभाऊ वारजूकर यांना सांगितले की आम्हाला प्रार्थना मंदिर बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्या असे सांगितले असता त्यांनी जागेची पाहणी करून आपल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधी मधून तीन लाख रुपये निधी मंजूर करून दिली व कामाला सुरुवात केली परंतु काम मोठे असल्याने त्यांना पुन्हा निधिची आवश्यकता पडली त्यांनी पुन्हा डॉ.सतीश वारजूकर यांच्या कडे मागणी केली या वेळी डॉ.वारजूकर हे शंकरपूर डोमा जिल्हा परिषद सर्कलचे नेतृत्व करत होते परंतु त्यांनी त्यांना पुन्हा निधी उपलब्ध करून देणार अशा शब्द दिला पंधरा दिवसात त्यांनी एक लाख पंन्नास हजार रूपये निधी दिली व ते काम पूर्ण झाले व आज डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले,