चारगाव (बु) येथे नेहरू युवा केंद्र यांच्या तर्फे युवा कल्याण,सकारात्मक जीवनशैली,कोविड 19' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले........
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भुतकर मो.न.8308264808
शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बु येथे २१ जानेवारी २०२२ रोज शुक्रवारला नेहरु युवा केंद्र चंद्रपूर ब्लॉक वरोरा यांच्या अंतर्गत.पुरोगामी संकल्प युवा मंडळ यांच्या सहकार्याने चारगाव बु येथे युवा कल्याण,सकारात्मक जीवनशैली, आणि फिट इंडिया युवाओ या विषयांचा अनुषंगाने, "HIV AIDS,"कोविड-19,पूरक पोषण आहार आणि योगा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच यावेळी उपस्तिथ नागरिकांना रजिस्टर, पेन,फाईल, आणि मास्क देऊन त्याने मनोबल वाढवण्यात आले.या बौद्धिक कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ.शालूताई भलमे यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारले तसेच सौ.मंगलाताई घनोडे ग्रा.सदस्या व सौ.अनिताताई टोंगे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्तिथ होते.या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री. विजय गाठले,महेंद्र रामटेके, कु प्रांजली मेश्राम आदी उपस्तिथ होते.तसेच नेहरू युवा केंद्र चंद्रपुर ब्लॉक वरोरा चे प्रतिनिधी श्री.स्वप्नील नारायण बावणे उपस्तिथ होते.व चारगाव बु पुरोगामी संकल्प युवा मंडळाचे अध्यक्ष.श्री शंकर गौरकर,सदस्य राकेश कुरेकार, विपुल मस्के, प्रतीक थुल, चेतन टोंगे इत्यादी सदस्य उपस्तिथ होते.....