पूजा फौंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा...

पूजा फौंडेशन तर्फे  प्रजासत्ताक दिन साजरा...

देशात खरंच प्रजेची सत्ता आहे का? - अमोल नन्नावरे

वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी 

राकेश भूतकर मो.न.8308264808


स्थानिक शेगाव बु येथून जवळ असलेल्या दादापुर या गावात शैक्षणिक जनजागृती करून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याचे कार्य पूजा फॉउंडेशन दादापुर करीत आहे याच अनुषंगाने पूजा फौंडेशन तर्फे प्रजकसत्ताक दिन साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.त्याच बरोबर विविध व्यक्तिमत्व विकासाच्या स्पर्धा आयोजित करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी पूजा फौंडेशन चे अध्यक्ष अमोल मोरेश्वर नन्नावरे,उपाध्यक्ष अमोल नामदेव बोधाने,गावातील सरपंच सौ विद्याताई खाडे,अल्का चौधरी, माधुरी खाडे,सौ. हिरकन्या चौधरी,समीर नन्नावरे, योगेश कोटकर,नीलिमा नन्नावरे, शिवानी शेळकी,साक्षी शेळकी, हर्षल बोधाने,काजल बोधाने व विद्यार्थी आणी समाजबांधव उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साची देवानंद तितरेनी केले तर आभार प्रदर्शन कु.रुपाली मारोती वाघ यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler