गणराज्य दिनाचे अवचित्त साधुन आमदार बंटी भांगडीया यांच्या शुभहस्ते नेरी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन संपन्न.

गणराज्य दिनाचे अवचित्त साधुन आमदार बंटी भांगडीया यांच्या शुभहस्ते नेरी येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन संपन्न. 

नेरी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम. 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीन वाघे



चिमुर- लोकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी. जगभरातील घडामोडी बाबत माहिती मिळून ज्ञानात भर पडावी या उद्देशाने नेरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. चिमुर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांचे शुभहस्ते हे उद्घाटन आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी हे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत नेरीच्या वतीने वाचनालय सुरु करण्यात आले.  वाचनालय हे एकमेव असे भंडार आहे ज्या ठिकाणी जगातील सर्व ज्ञानाचे पूर्ती केली जाते. वाचनालयामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती काही ना काही ज्ञान घेऊन बाहेर जातो. वाचनालयातून केवळ ज्ञानच न देता  सुसंस्कृत ज्ञान दिले जाते. आज एकविसाव्या शतकात गाव तिथं वाचनालय हे आता मान्य झाले आहे. काही गावात शासनाच्या वतीने वाचनालय सुरू होतात. गावात वाचनालय सुरु झाले की गावातील लोकांना वाचनाची आवड निर्माण होते. आपला रिकामा वेळ गावकऱ्यांनी वाचनालयात घालवता आला पाहिजे व घर कामात गुंतलेल्या गृहिनी वेळात वेळ काढून वाचनालयात जातात आणि चांगली पुस्तके वाचतात  कारण आजची आधुनिक पिढी हे वाचनालय आणि ग्रंथालय यासारख्या गोष्टींना विसरत चालली आहे. दररोज हजारो पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके प्रत्येक व्यक्तींना खरेदी करणे सोपे नाही. ज्या व्यक्ती ना वाचनाची आवड आहे. त्यांना नेरी येथील गोर गरीब विद्यार्थी गावांमध्ये वाचनालय नसल्यामुळे चिमूर येथे अभ्यास करण्यासाठी जाऊन आपला वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करत होते तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती जाण्या-येण्याची नव्हती त्यांनी घरीच अभ्यास केला. आज च्या युगामध्ये स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी युवक व युवतींना वाचनालयाची खूप आवश्यकता नेरी मध्ये भासत होती ही अडचण ग्रामपंचायत सर्व सदस्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी एकमताने ठराव घेऊन नेरी मध्ये सर्वांसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालय ची निर्मिती केल्यामुळे नेरी शहरात आनंदाचे वातावरण पसरले दिसुन येत आहे. केली. या वाचनालयाची उद्घाटन करते वेळी रेखा पिसे ( ग्रामपंचायत सरपंच), चंद्रभान कामडी(उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler