ब्रेकिंग - वाघाच्या हल्ल्यात बैल ठार तर एक बैल गंभीर जखमी

ब्रेकिंग - वाघाच्या हल्ल्यात बैल ठार तर एक बैल गंभीर जखमी


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058

 


वरोरा:- तालुक्यातील मागली (दे) येथे काल रात्री 1 च्या सुमारास शेतात बांधलेल्या बैल जोडीवर वाघाने अचानक हल्ला केला.या हल्ल्यात एक बैल जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे 

   मागली( दे ) येथील शेतकरी लालबाजी मारेगामा आपल्या शेतांत नेहमीप्रमाणे साय. बैल बांधून घराकडे गेले रात्री ला बैलावर वाघाने अचानक हल्ला करून बैलाला ठार केले नेहमी प्रमाणे शेतकरी सकाळी आपल्या शेतात बैल सोडण्यासाठी गेले असता एक बैल मृत अवस्तेत तर दुसरा गंभीर जखमी अवस्तेत आढळून आला त्यांना वाघांनी हल्ला केला असे माहित होतच वनविभागाला याची माहिती दिली  वनविभागाचे कर्मचारी डी. बी चांभारे क्षेत्र सहायक टेमुरडा एस डी वाटेकर वंनरक्षक रामपूर यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला व शेतकराच्या झालेल्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही पाठपुरवठा करू असे आस्वासन दिले उपस्तिथ गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी वनविभागाला केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler