ब्रेकिंग-चिमुर तालुक्यातील काग शेतशीवारात गोठ्यात बांधुन असलेल्या गायीला वाघाने केले घायल.
प्रतिनिधी -प्रवीन वाघे,
चिमुर तालुक्यातील मौजा काग येथे नदिया किनारी शेतकरी रुपेश डाहुले यांच्या शेतात गोठ्यात बांधून असलेल्या गाईवर वाघाने सकाळी ४ वाजताच्या दरम्यान हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे च्या गाढ झोपेत असलेल्या नागरीकांना बाहेरुन आवाज आला शेतकरी रुपेश हे आपल्या शेतात गोठ्याकडे बघितल्यावर त्यांना त्यांची गाय जखमी अवस्थेत आढळून आली गावात ओरडारोड झाली व वाघाने तिथून पळ काढला. घट स्थळी नागरीकांनी गर्दी केली. वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे राऊंड आफीसर रमेश नरड हे आपल्या टिमसह पोहचुन पंचनामा केला. पुढील तपास चालू आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी भयभीत झाले आहेत. जखमी गाईचे मालक डाहुले यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी नागरीकांची मागणी आहे.