ब्रेकिंग- दुचाकी स्वारा ला वाचविण्याच्या पयत्नात चंद्रपूर चे नगरसेवक दीपक जैस्वाल यांच्या कारचा अपघात

ब्रेकिंग-  दुचाकी स्वारा ला वाचविण्याच्या पयत्नात चंद्रपूर चे नगरसेवक दीपक जैस्वाल यांच्या कारचा अपघात


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058



वरोरा :- नागपूर - चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथील पेट्रोल पंप समोर नागपुर वरून चंद्रपूर  कडे जात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेचे  नगसेवक दीपक जयस्वाल यांच्या गाडीचा समोरून  अचानक टीप्पर आल्याने  चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. गाडीने रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली यात मोठी हानी झाली नसली तरी दिपक जयस्वाल यांचे चालक यांना डोक्याला दुखापत झाली आहे तर  दुचाकीस्वार रमेश चंद्रभान जेणेकर रा . पिचदुरा  हे किरकोळ जखमी झाले आहे . जखमींना उपचारांसाठी वरोरा येथे हलविण्यात आले . धडक एवढी जोरदार होती की चंद्रपूर दिशेने जाणाऱ्या कारने नागपूर मार्गावर वळण घेतली होती. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी  जयस्वाल यांच्या गाडीचे मोठें नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler