भरधाव ट्रॅक्टर ने सार्वजनिक नळाला मारली ठोस, सूरज नरुले नी न. प. सीओ ला केला फोन.

भरधाव ट्रॅक्टर ने सार्वजनिक नळाला मारली ठोस, सूरज नरुले नी न. प. सीओ ला केला फोन. 

भाजप शहर महामंत्री सुरज नरुले ची अशीही तळमळ

तात्काळ सीओ यांनी पाणी पुरवठा कर्मचारी यांना पाठवून केली नळ व बोरिंग ची दुरुस्ती.


प्रतिनिधी-प्रवीन वाघे, 


 चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र २ काडकूड नगर मध्ये भरधाव ट्रक्टर ने ठोस मारल्याने  सार्वजनिक नळ तुटला. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळण्याची टंचाई निर्माण होऊन त्रास होणार होता. यापूर्वी हातपंप बंद अवस्थेत होते.

 तेव्हा भाजप शहर महामंत्री सुरज नरुले यांनी प्रभारी मुख्याधिकारी पवार यांचेशी फोन वरून संपर्क करीत दुरुस्ती ची मागणी केली तेव्हा तात्काळ पाणी पुरवठा कर्मचारी पाठवून नळ व हातपंप दुरुस्त करण्यात आले. 

  चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र २ काडकुड नगर मध्ये अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांची ट्रॅक्टर उभी राहत असताना. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक नळ आहे. भरधाव ट्रक्टर चालवून सार्वजनिक नळा ची तुटफुट होऊन नळाचे पाणी भरणे कठीण झाले होते.जवळपास असलेले हातपंप बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पाणी समस्या निर्माण झाली होती.तेव्हा भाजप शहर महामंत्री सुरज नरुले यांनी प्रभारी सीओ पवार यांना फोन संदेश करीत तात्काळ दुरुस्ती ची मागणी केली. पाणी पुरवठा कर्मचारी येऊन  सार्वजनिक नळ व हातपंप दुरुस्त करून जनतेला पाणी मिळण्याची व्यवस्था करून दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler