बातमी लिहाल तर गुन्हे दाखल करू असा पत्रकाराच्या घराला तहसील दाराचा नोटीस
तहसीलदार रोशन मकवाणे यांची दडपशाही लोकशाही च्या स्तंभाला धमकवण्याचा प्रयत्न
दैनिक नवजीवन च्या प्रतिनिधी यांचे घरावर लावले फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पत्रक
वरोरा : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असतो.समाजातील चांगल्या वाईट घटनांचा आपल्या जीवावर खेळून पत्रकार बातम्या शोधतो व समाजासमोर मांडतो.मात्र याच बातम्या मुळे पत्रकाराला तुम्ही माफी मागा अन्यथा तुमच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करू असा नोटिसच पत्रकाराच्या घरावर लावण्याचा प्रकार वरोरा तहसीलदार रोशन मकवाणे यांनी केल्याने पत्रकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पत्रकारांच्या निर्भिड लेखणीला फौजदारी कारवाहिचा धाक दाखवून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा तहसील कार्यालयाला लाभलेले तहसीलदार रोशन मकवाणे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे. अवैध गौण खनिज तस्कर यांच्यावर महसूल प्रशासन मेहेरबान असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.तलाठ्याने ट्रॅक्टर पकडायचे आणि तहसीलदाराने सोडायचे असा काही प्रकार सध्या महसूल प्रशासनात सुरू असल्याने महसूल प्रशासन संशयाच्या भोवर्यात सापडले आहे.
तालुक्यातील खांबडा येथे दि.8 ला रात्री एक वाजेच्या दरम्यान तलाठी शरद दाते,दिलीप शेळकी व तहसीलदार यांच्या गाडी चालकाने खांबाडा गावाजवळ काळ्या रेतीने भरलेला बिगर नंबर असलेला ट्रॅक्टर पकडला. व तो ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.मात्र त्या ट्रॅक्टर वर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता तहसीलदार रोशन मकवाणे यांनी तो ट्रॅक्टर सोडल्याची चर्चा तहसील कार्यालयात जोरदार सुरू होती.
तो ट्रॅक्टर अवैध तस्करीचा नोव्हता तर त्याला तहसील कार्यालयात जमा करण्याचे कारण काय ? त्यावर काय कारवाही करण्यात आली? याचे उत्तर अजूनही कोड्यात दिसून येत असल्याने याबाबत पत्रकारांनी तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी तो अवैध रित्या रेतीची तस्करी करत असल्याच्या आधारे पकडल्याची माहितीला दिली त्यामुळे संबंधित कारवाही मध्ये संशय व्यक्त होत असल्याने काही देवाण घेवाण झाली असल्याच्या चर्चेला पेच फुटला होता. या बाबत पत्रकार ओम चावरे यांनी बातमी प्रकाशित करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून महसूल प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणावर कुठलेही भाष्य व खुलासा न करता पत्रकार चावरे यांच्या घरावर तहसीलदार यांनी चक्क नोटीस लावून तुम्ही दिलेल्या बातमी संदर्भात माफी मागा नाही तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल असा अजब फतवा काढल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास लोकसेवक यांच्या कडून ठेविस धरण्याचा प्रकार सुरू आहे.
तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे यापूर्वी वरोरा तहसील कार्यालयाचा कारभार होता. त्यांचा कार्यकाळ सुद्धा काहीसा असाच वादग्रस्त ठरला त्यांच्या कार्यकाळात सुद्धा बेबंदशाही व पत्रकारांना धमकवण्यात गेला.त्यांनी सुद्धा याच प्रकारे पत्रकारांना छळण्याचे प्रकार केले होते.त्यांच्या सुद्धा अनेक कारवाया संशयास्पद होत्या त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर रोशन मकवाणे यांना वरोरा तहसील कार्यालयाचा कारभार देण्यात आला. वरोरा तहसीलचा कारभार प्रथमच महिला तहसीलदार यांच्या हातात गेल्याने नागरिकांच्या आशा आकांशा प्रफुल्लित झाल्या होत्या.मात्र या सर्वांना दुजोरा देत तहसीलदार रोशन मकवाणे सुद्धा आपल्या खुर्चीचा रोब जमवून त्यांच्या विरोधात लिहिणाऱ्याचे या मार्गातून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.मात्र ही लोकशाही आहे.इथे पत्रकाराला आपले मत मांडण्याचा व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा व सडेतोड लिखाण करण्याचा अधिकार आहे.त्यामुळे तहसीलदार यांनी काढलेल्या अजब फतव्याचा पत्रकार यांच्या कडून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवून पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाही करून कर्तव्य दक्ष प्रशासनाचा वचका कायम ठेवावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.