सिरपूर येथील तमुस लावुन दिले प्रेमी युगलांचे प्रेमविवाह
प्रतिनिधी नेरी
प्रवीण वाघे
शिवनपायली येथील प्रवीण चिंधुजी वाळके वय 27 वर्षे आणि मुलगी सपना राजू मेश्राम वय 21 वर्षे पूर्ण यांचे मागील 2 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते दोघेही नागपूर येथे एकमेकांना भेटले प्रवीण हा नागपूर यर्थे खाजगी कंपनीत कामाला होता तर सपना ही सुद्धा नागपुरात शिक्षण घेत होती दोघांचीभेट होऊन ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि भेटीगाठी वाढल्या यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या व ह्या चर्चा घराच्या पर्यंत पोहचल्या तेव्हा यांच्या प्रेमाला घरच्या मंडळींनी विरोध करून त्यांना समज दिली परंतु दोन्ही ही प्रेमवीर समजण्यापालिकडे प्रेमात आकंठ बुडाले होते त्यांनी घरच्यांना न जुमानता लग्न करण्याचा निर्णय घेतला नागपूर वरून सरळ सिरपूर येथे येऊन तमुस कडे विवाह करण्यासाठी रीतसर अर्ज केला तेव्हा तंटा मुक्त समितीने संपूर्ण कागदपत्राची योग्य चौकशी करून त्यांच्या वयाची तपासणी करुन सर्व तमुस सदस्याच्या संमतीने एकमताने लग्न लावून देण्याचे ठरविण्यात आले व रीतिरिवाजानुसार दोघांचेही विवाह सर्व तमुस समिती व गावकऱ्यांच्या उपस्थितीत लावून देण्यात आले. या विवाह प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास बोरकर , वैशाली निकोडे सरपंच, राजू भानारकर उपसरपंच , मंगेश भानारकर पोलिस पाटील, दिवाकर डाहारे ,धनंजय मेश्राम तंटा मुक्त समिती उपाध्यक्ष, महेंद्र देकाटे पोलीस पाटील शिवनपायली, सुनिल कोसे पत्रकार, मनोहर सेनदरे, भगवान आदे, जयपाल गावतुरे, वर्षा डाहारे , पुष्पा कापगते, भीमराव वाळके, ईत्यादी समिती सदस्य उपस्थित होते यावेळी नवोदित वरवधुंला शुभाशीर्वाद देण्यात आले.