वडधा (तू ) येथे नागदिवळी मोहत्सव साजरा...

वडधा (तू ) येथे नागदिवळी मोहत्सव साजरा...

वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर मो.न.8308264808


वरोरा तालुक्यातील सातारा या गावात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 8 व 9 जानेवारी  ला नागदिवळी मोह्त्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी संस्कृती चे जतन होऊन संवर्धन व्हावे व आदिवासी  समाजाची संस्कृती, चालीरीती, परंपरा, इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या अनुषंगाने  विदर्भात ज्या गावात आदीवासी माना जमात वास्तव्यास आहे त्या त्या गावात नागदिवळी मोहत्सव साजरा केला जातो. यावेळी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ ग्रामशाखा वडधा (तू ) द्वारे या मोहत्सवाच आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा.ईश्वर घोडमारे (माझी सभापती आदिवासी सहकारी संस्था ) मार्गदर्शक :- मा.डॉ. शालिक झाडे (प. समिती सदस्य )  मा. अमोल मोरेश्वर नन्नावरे (अध्यक्ष पूजा फॉउंडेशन ) मा. श्री.गुरुदेव नन्नावरे, मा. बिरसा हनवते, मा. नामदेव नन्नावरे, मा. सौ. ज्योतीताई पोयाम (सरपंच ), मा. मारोती मगरे   मा.धारणे साहेब, व समस्त समाजबांधव  उपस्थित होते. यावेळी  कार्यक्राचे सूत्रसंचालन गिरीधर नन्नावरे   प्रास्ताविक कु. तेजस्विनी घोडमारे  यांनी केले तर आभार प्रदर्शन नितेश नन्नावरे यांनी केले..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler