खुंटाळा येथील ग्रामसेवक विठ्ठल नखाते यांना तात्काळ निलंबित करा.

खुंटाळा येथील ग्रामसेवक विठ्ठल नखाते यांना तात्काळ निलंबित करा.

सरपंच सचिवांच्या मनमानी कारभारामुळे सदस्य व गावातील नागरीक त्रस्त 

ग्रा प सदस्य ची कारवाईची मागणी

संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली तक्रार


प्रतिनिधी-प्रवीन वाघे


नेरी। चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या खुंटाळा ग्रामपंचायमधील सरपंच आणि सचिवांचे मनमानी कारभारामुळे ग्रा प सदस्य त्रासले असून स्वतःच्या मर्जीने कारभार सुरू असून कोणत्याही सदस्य चे मत विचारले जात नाही त्यामुळे सरपंच याना पायउतार करून सचिवाला निलंबित करावे अशी तकार निवेदन सवर्गविकास अधिकारी यांना दि 18 जाने ला दिले 

                        सदर ग्रामपंचायत खुटाळा येथील   ग्रामपंचायत येथे सचिव म्हणून श्री. विठ्ठल नखाते व सरपंच म्हणून मृणाली बोरकर हे कार्यरत आहेत. सदर सरपंच व सचिव यांनी दि. 28 डिसें ला  नासिक सभा जाहिर केली होती त्याची रीतसर नोटीस सर्व सदस्य यांना पाठविण्यात आले होते. मात्र काहि कारणास्तव सदर सभा रदद करण्यात आली असे मोबाईलद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर त्यांनी तीच सभा दि. 30 डिसें ला सभेचे नोटीस जाहिर न करता आयोजित केली. यांची माहिती सदस्यांना व्हॉटसअप ग्रुप वर टाकण्यात आली होती. परंतु सर्वच सदस्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सदर सभेची माहिती मिळू शकली नाही. नियमानुसार सदर सभेची नोटीस पत्येक सदस्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्यामुळे  सदस्य सदर सभेस उपस्थित होचु शकला नाही. त्यानंतर तिथ सभा दि. 06 जाने ला तहकुल सभा ठरवून सदर सभेचे रितसर नोटीस घेण्यात आली. मात्र सदर सभेचा कोरम पूर्ण होण्याआधीच सदर सभेला सुरुवात करण्यात आली होती. काही वेळातच ग्रा प सदस्य सदर सभेला पोहचलो व सदर सभा कोरम पुर्ण होण्याआधी कशी काय सुरु करण्यात आली याबाबतच विचारणा करण्यात आली असता मागील सभा तहकुब झाली होती असे कळविण्यात आले. त्यानंतर आम्ही सदर सभा तहकुब कशी काय झाली याबाबत विचारण करून दि. 30डिसें  च्या सभे बाबत  सदस्यांना नोटिस देण्यात आले नव्हते असे प्रोसिडींग वर लिहावे अशी मागणी केली असता सचिव यांनी टाळाटाळ करीत सभेतून पळ काढला. याबायत सरपंच यांना वर्ष अखेरची सभा का घेण्यात आलेली नाही याबाबत विचारणा केली असता मला याबाबत विचारणा केल्यास आपणावर  पोलीस तक्रार करण्यात येईल असे धमकावण्यात आले. त्यामुळे सदर गंभीर प्रकरणाची योग्य व रितसर चौकशी करुन सदर बेजावबदार सरपंच यांना पायउतार करुन सचिव यांना निलंबित करण्यात यावे. व ग्राम पंचायत खुटाळा ला नियमित सचिव देण्यात यावे  अशी मागणी ग्रा प सदस्य  अरमान बारसागडे तुलाराम बारसागडे सुधाकर सोनवाने यांनी केली आहे या करिता सवर्गविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे तसेच मुख्यकार्यपालन अधिकारी चंद्रपूर ,जी प सदस्य मनोज मामीडवार प स सभापती लता पिसे याना प्रतिलिपी देण्यात आली आहे. आता यापुढे काय कारवाई होते याकडे नागरीकांच लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler