मराठी भाषा समृद्ध व अमृताहुनही गोड आहे डॉ. मीनलताई रामप्रसाद शेळके

 मराठी भाषा समृद्ध व  अमृताहुनही गोड आहे

डॉ. मीनलताई रामप्रसाद शेळके

 राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक बुलढाणा

दे राजा- मराठी भाषा बोलणारा माणूस हा नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचला आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे इतर भाषांचे ज्ञान सर्वांनी अवगत करावे परंतु मराठी भाषेला मुळीच विसरून चालणार नाही. कारण मराठी भाषा  अमृताहुनी गोड आहे असे प्रतिपादन डॉ मीनलताई शळके यांनी केले.




राजलक्ष्मी शाळेमध्ये कुसुमाग्रजांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. मीनल शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मगर सर, मुख्याध्यापिका मनीषा नायडू होत्या. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपावी आणि तिचे संवर्धन करण्याचे आवाहन या प्रसंगी रवींद्र मगर यांनी केले. तसेच प्राचार्या मनीषा नायडू, सपना पारवे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.


 वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर रिकी कांबळे सर व विद्यार्थ्यांनी हीच आमची प्रार्थना या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रस्ताविकामध्ये सुनिल पवार यांनी मराठी कविता सादर करून मराठी भाषेचे महत्व विषद केले.तसेच देवांश भुतेकर, समृद्धी सोनवणे, ईश्वरी कोल्हे,पुष्कर साळवे, तन्वी वायाळ, शलाका खरात, तन्मय काकड, मैथली तायडे, प्रिया शिंदे, यांनी मराठी भाषा दिनावर भाषणे दिली तर निखिल पवार, अमेध मोगल, आयुष्य शिंदे, श्रुती नागरे, मानिनी नायडू यांनी कविता सादर केल्या. लघुनाटिकेच्या सादरीकरणानंतर ही मायभूमी, ही कर्मभूमी, ही जन्मभूमी या गीतावर अनुष्का वाघमारे, ज्ञानेश्वरी शेळके, आकांक्षा बनकर, ज्ञानेश्वरी नागरे, सार्थिका डुणगहू यांनी नृत्य सादर केले.


    तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज तसेच अनेक नामवंत कवींच्या कवितांचा जीवन परिचय चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून करून दिला. त्यामध्ये मैथिली तायडे, आयुषी भालेराव, लब्धी साकला, राशी साकला, प्राप्ती मैद, तेजस बुरुकुल, प्रेम धोत्रे, अजिंक्‍य कासारे, साक्षी भागिले, आदिती चव्हाण, गौरी चव्हाण, प्रणव मगर, विनायक मगर,हर्षवर्धन जाधव, स्वराज्य मिसाळ, संस्कृती कांबळे, समृद्धी सोनवणे, अश्विनी जाधव, मयूर मुंढे,आर्यन झोटे,श्रध्दा सुरसे,आर्या वराडे, प्रज्वल दंदाले, अर्थव झोटे,पार्थ जाधव, यांनी आपला सहभाग नोंदवला. तर प्राथमिक विभागांमधून आर्या शिंगणे, संजीवनी जगताप, आराध्या डोंगरे यांनी भाषणे दिली तर आदिती भालेराव, सोनम सावंत यांनी गीत तर शाहू खरात या विद्यार्थ्याने कविता सादर केली. तसेच मी मराठी, मी मराठी या गीतावर माहेश्वरी राठोड, समृद्धी हिवाळे, खुशी डुणगहू, प्राची पराड, समिक्षा देशमुख यांनी नृत्य सादर केले. महाराष्ट्रीयन पुरुषांची वेशभूषा शिवम आरमाळ, राजवीर गवई, अभीर नागरे, ईश्वरी पडूळकर, कार्तिकी इंगळे यांनी केली. सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler