रामानुजन रामानुजन सायन्स क्लासेस ,देऊळगाव राजा
क्लासेस ,देऊळगाव राजा
तालुका प्रतिनिधी देऊळगाव दत्ता हांडे
आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरास मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. डॉ.सचिन जाधव ,असिस्टंट कमिशनर ,अन्न व औषध प्रशासन ,मुंबई यांची उपस्थिती लाभली.
10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना
NEET, JEE-IIT व इतर करियर ऑप्शन्स बद्दल मार्गदर्शन करताना ,
"आजच्या ऑनलाइन अभ्यासाबरोबरच ऑफलाइन क्लासरूम सपोर्ट ची सुद्धा गरज आहे. अकरावी व बारावी हा आपल्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरतो त्यामुळे ही दोन वर्ष पूर्ण जिद्दीने व मेहनतीने अभ्यास करून आपल्याला पाहिजे असलेल्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन मिळवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. वैद्यकीय इंजिनीरिंग सोडूनही भरपूर करिअर ऑप्शन्स आजच्या काळात असून त्यादृष्टीनेही पालकांनी शोध घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे करिअर निवडून देण्याकरता पालक, शिक्षक व त्या त्या क्षेत्रांमधील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यायला हवे.
अभ्यासातील सातत्य, सराव व वेळेचे योग्य नियोजन करून कोणत्याही परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवता येईल" असे डॉ. जाधव यांनी प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून अभ्यासातील तसेच करिअर संबंधी प्रश्नाबाबत श्री. डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मनस्वी जाधव व कु. साक्षी वाघ यांनी केले कार्यक्रमास श्री. माधव बुरुकुल सर,श्री लक्ष्मण खांडेभराड सर, श्री दिलीप शेळके सर ,श्री सुमेध धोटे सर, श्री.राजेश गाठोळे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे समारोपीय भाषण रामानुजन क्लासेसचे संचालक श्री.राम इरतकर सर यांनी केले.