अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- तालुक्यालगत असलेल्या एकर्जुना गावातील इसम आपले गुरे घेऊन चराई साठी नेत असताना अचानक अज्ञात वाहनाने त्यांना जब्बर धडक दिली धडक एवढी जब्बर होती की त्यात त्या गुरे चरणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला साधारणता ही घटना 11 ते 11.30 च्या दरम्यान घडली
मृतक कवडू शंकर मांडवकर हा डॉ. चांडकं यांच्या कडे त्यांचे गुरे चारण्यासाठी गुराखी म्हणून नोकर होता. नेहमी प्रमाणे आज दिनांक 4 फेब्रुवारी ला आपले गुरे घेऊन चरायला गेले आणी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचून घटना स्थळाचा पंचनामा करून शव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून शविछेदन केले
पोलीस अधिकारी उपनिरिक्षक बेलसरे यांनी आज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे