गावातील गरीब लोकांच्या पोटावर स्वयंघोषित रोजगार सेवकाने मारली लाथ पारडी गावातील ग्रामरोजगार सेवकाचा प्रताप
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:तालुक्यातील ग्रामपंचायत पारडी (गिरोला) येथील स्वयघोषित रोजगार सेवक शरद रामभाऊ काकडे यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणी जवळीक असेलेलं कामगार हे एकही दिवस कामावर न जाता त्यांचे नावे रोजगार हमीचे मस्टर बनवून उचल केली.
सविस्तर वृत असे की...
ग्रामपंच्यायत पारडी ( गिरोला ) येथील स्वयंघोषित रोजगार सेवकाने आपसी लोकांच्या नावे रोजगार हमीच्या मस्टर वर नाव चडवून पैसे उचलले आणी स्वतःच्या शेतात फळबाग योजनेतील एकही झाड न लावता पैशाची उचल केली.
जॉबकार्ड बनविण्यासाठी गरीब मंजूर वर्गाकडून घरकुल योजनेच्या लाभार्थी लोकाकडून पैशाची मागणी केली आणी कामावर घेण्यासाठी 4/5 वेळा अर्ज करून सुद्धा गरजू महिला व पुरुष मजुरांना टळवा टळवी चे उत्तर देऊन कामावर सुद्धा घेतले नाही आज पर्यंत एकही जॉब कार्ड वर व हजेरी वहीत हजेरीची नोंद नाही त्यामुळे स्वघोषित रोजगार सेवक शरद रामभाऊ काकडे यांना रोजगार हमी च्या कामात मोठी अफरातफर केली त्या संबंधी त्याच्या वर कार्यवाही करण्यात यावी या साठी पंचायत समिति वरोरा चे बिडिओ राठोड साहेबाना निवेदन देऊन या प्रकणाची सखोल चौकशी करून त्या भामट्या रोजगार सेवकावर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन प्रहार सेवक शेरखान पठाण गावकरी मेघशाम दाभेकर दिलीप काळे तुळशीराम येटे खुशाल मोडक आणी पारडी गिरोला येथील महिला मजूर व पुरुष वर्ग उपस्तित होते.
चौकशी चे दिले आदेश
स्वयंघोषित ग्रामरोजगार सेवक यांनी केलेल्या अपरातफरी च्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आणी योग्य ती कार्यवाही होईल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना बिडिओ राठोड साहेबानी सांगितले