श्री.भागवत लहुबुवा ढोले यांना संगीत विषयात पी.एच.डी प्रदान
आकाश नागरे/अंबड तालुका प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संगीत विभाग संशोधक विद्यार्थी भागवत ढोले यांना पी.एच.डी पदवी प्रदान केली त्यांनी मराठवाड्यातील वारकरी संप्रदायातील सांगीतिक दृष्टीने चिकीत्सक अध्ययन या विषयावर प्रबंध सादर केला त्यांना डॉ.भोजराज चौधरी सर माजी सह संचालक अमरावती यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे कुलगुरू-प्रो.डॉ.प्रमोद येवले सर प्र.कुलगुरू प्रो.डॉ.श्याम शिरसाठ सर व डॉ.गणेश मंझा सर ,डॉ.कैलास पाथ्रीकर सर ,डॉ.के.एम जाधव सर.डॉ.जयंत शेवतेकर सर श्री.ह.भ. प.लहुजी महाराज ढोले यांनी अभिनंदन केले.