आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथे पालक मेळावा संपन्न

आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथे पालक मेळावा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे ८९२८८६००५८


 वरोरा :- आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथे 18 फेब्रुवारी 2022 रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ.मृणाल काळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते

      पालकांचा आणि शिक्षकांचा कुठे तरी संवाद व्हावा,महाविद्यालयातील नवनवीन उपक्रमांची माहिती पालकांना व्हावी,हा उद्देश ह्या पालक मेळाव्याचा होता.याप्रसंगी उपस्थित पालकातील अनेकांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालय व त्यांचा पाल्यांच्या भविष्यासाठी काही सूचना सुचवल्या. याप्रसंगी एकंदरच महाविद्यालयाच्या दृष्टीकोनातून साधक बाधक चर्चा ही झाली.

   आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.मृणाल काळे यांनी पालकांनी सुचविलेल्या सूचना महाविद्यालय नक्कीच पूर्ण करेल असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या पालक मेळाव्याच्या संयोजिका सहाय्यक प्राध्यापक कल्पना काळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला व महाविद्यालयाच्या प्रगतीचा धावता आढावा ही घेतला.

        कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्राध्यापक विद्दा दडमल तर आभारप्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक सुरेश राठोड यांनी केले.सहाय्यक प्राध्यापक मनोहर चौधरी, हेमंत परचाके,प्रियांका भुक्या यांच्या आयोजनात व प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात हा मेळावा संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler