बुलढाणा जिल्हा. संपादक. राजेंद्र डोईफोडे
संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित होणारे शैक्षणिक चळवळीसाठी प्रेरणादायी मासिक शिक्षण संवेदन अनुराग प्रकाशनाच्या वतीने 15 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारी नाट्यगृह कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते.पुरस्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतीय संविधानाचे पूजन व शिव घोषाने प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षक श्री. हि .रा .गवई श्री शिवाजी हायस्कूल इसोली ता. चिखली जि.बुलढाणा या ठिकाणी तेवीस वर्षापासून कार्यरत असून एक विद्यार्थीप्रिय शिक्षक व गरजवंत विद्यार्थ्यांना नेहमी मदत करून शैक्षणिक सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहून महापुरुषांचे विचार सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध वर्तमानपत्रातून सतत लेखन करतात. त्यांच्या या बहुमोल कार्याबद्दल शिक्षण संवेदन मासिक अनुराग प्रकाशन तर्फे राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 सन्माननीय संपादक डॉ. माधव गवई,डॉ. केशव जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आकर्षक सन्मान चिन्ह व पुस्तके शिक्षण संवेदन मासिक संच देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुभाष खंदारे ,विजयसिंह नाईक डॉ.दीपक वाघ, डॉ.अपरणा प्रभू, डॉ.केशव जाधव एडवोकेट श्री मनोहर मोरे व भिमराव इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार सोहळ्याचे आयोजन डॉ. माधव गवई संचालक संपादक शिक्षण संवेदन, डॉ. कमल माधव गवई प्रकाशिका अनुराग प्रकाशन कल्याण यांनी केले.
महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री हि.रा.गवई यांचे डॉ.श्री.पी.एस वायाळ स्वीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ.के.पी. वासनिक माजी आयुक्त नवी दिल्ली,मुख्याध्यापक श्री जाधव सर, मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, श्री सुभाष पाखरे प्रकल्प अधिकारी चिखली, श्री प्रशांत डोंगरदिवे, अखंड झेप संपादक श्री रवींद्र वाघ,श्री मेरतकर सर, श्री शेख सर, श्री सूर्यवंशी सर, कुटे सर , सपकाळ सर, गव्हांदे सर, श्री सुनील गवई सर लोकनेता चे संपादक श्री बुधवत साहेब,माजी विद्यार्थी, विद्यार्थी, मित्र, नातेवाइकांकडून तसेच आदर्श अर्बन पतसंस्था सर्व संचालक मंडळ व संत कबीर पतसंस्था संचालक मंडळ मानवाधिकार संघटन बुलढाणा अशा विविध संघटना कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.