शिंदी येथे रविकांत तुपकर व अजीम नवाज राही यांचा नागरी सत्कर

 पक्षांचा झेंडा व दांडा बाजूला सारून शेतकरी म्हणून लोकांनी एकत्र यावे

-शेतकरी नेते रविकांत तुपकर .




राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी काळुंका मातेच्या मंदिरा समोर शेतकरी नेते रविकांत तुपकर व प्रख्यात साहित्यिक अजीम नवाज राही या दोघांचाही शिंदी ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  केशव बंगाळे हे होते .


तर प्रमुख उपस्थिती म्हणून दै ..द जिल्हा एक्सप्रेस चे मुख्य संपादक तथा लोकशाही मराठी पत्रकार संघाचे महासचिव अँड.जीशान खान . अँड.विनोद नरवाडे,एडवोकेट भालेराव .हे होते 

सर्वप्रथम रविकांत तुपकर यांचे गावात आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी ढोल-ताशांच्या गजरामध्ये त्यांचे भव्य मिरवणूक कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आले .

यावेळी त्यांनी छ. शिवाजी महाराज शिहाजी महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला .नंतर ते सभास्थळी दाखल झाले .




.यावेळी रविकांत तुपकर व अजीम नवाज राही यांच्या हस्ते शिंदी येथील समाधान बंगाळे .यांनी अपंग असून सुद्धा कळसुबाई हे शिखर सर केले त्यानिमित्त यांचा सत्कार करण्यात आला .तसेच सावंगी भगत येथील निलेश गवई यांनी सुद्धा गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली त्याबद्दल सुद्धा त्याचा सत्कार करण्यात आला .


एवढी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन खंडारे यांनी केले .त्यानंतर पंढरीनाथ खरात शिक्षक यांनी सुद्धा रविकांत तुपकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,,त्यानंतर दै .द जिल्हा एक्सप्रेस चे मुख्य संपादक झिशान खान .यांनी आम्ही सुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी न्यायाच्या भूमिका बजावू असे सांगितले .

त्यानंतर सत्काराला उत्तर देताना प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांनी .जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच शेरोशायरी कविता हास्याचे  फवारे उडून त्यांनी उपस्थितांची मन जिंकले .यानंतर रविकांत तुपकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की






अठरा वर्ष शेतकऱ्यांसाठी मी खर्च घातली शेतकऱ्यांची एकजूट ही महत्त्वाची असून जोपर्यंत शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू शकणार नाही .शेतकऱ्यांची येते हे महत्त्वाचे असून पक्षाचा झेंडा आणि दांडा बाजूला सारून शेतकरी या नात्याने एकत्र यावे .


यावेळी कार्यक्रमाला .अनिकेत सैनिक स्कूल चे संस्थापक अर्जुन गवई .विनायक सरनाईक .नितीन राजपूत .कार्तिक खेडेकर .अमोल मोरे .धिरज मोरे लहु शक्तीचे संतोष गायकवाड . गोरेगावचे संजय पंचाळ,शिंदी सरपंच विनोद खरात पप्पू पठाण,गुंज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक तुपकर,बबन दादा लोंढे .अनिल तुपकर .लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे .गणेश पंजरकर . सावंगी भगत येथील  प्रवीण गवई .सोहम गवई निलेश गवई,पोलीस पाटील गवई,

आदी यावेळी उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी .

संजय हाडे अनिल भगवान बंगाळे.माजी सरपंच अशोक खरात, नितेश खरात,मंगेश बंगाळे . मदन हाडे

पप्पू पठाण .गजानन खंडारे मेहकर .गजानन बेलोडे .अजय खंडागळे .कडुबा खंडारे अरविंद खंडारे .सुनील बंगाळे .पंजाबराव हाडे .रमेश पागोरे .मधुकर खरात .सुनील खरात .मनोज वैद्य .


आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात कवी रामदास कोरडे यांनी केले .तर आभार पत्रकार सचिन खंडारे यांनी मानले .कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler