विविध समस्यांनी ग्रासलेल्या नेरी ग्रामपंचायतच्या पुढे येत्या 15 तारखेला प्रहार बेशरमाचे झाड लाऊन बेमुदत आमोरन उपोशन करणार ग्रामपंचायत ला दिला इशारा
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
चंद्रपूर:- नेरी शहरातील नाल्या चोरीला गेल्या नेरी शहरातील पिण्याच्या पाण्याची टाकी ही अजीर्ण झाली असून गेल्या कित्येक वर्षांपासून ती टाकी साफ केलेेली नाही, त्याच अवस्थेत असलेल पाणी आजही नळाला येतो जलशुद्धीकरणाच्या नावाखाली शासनाकडुन करोडो रुपयाचा निधी वसुल करुन जलशुद्धीकरणाची पिण्याच्या पाण्याची टाकी ही शोभेची वस्तू बनली आहे. नेरी शहरात सिमेंट कांक्रेट रस्त्याचे काम हे नीक्रुष्ट दर्जाचे झाले असून याला जबाबदार कोण संबंधित ठेकेदारावर नेरी ग्रामपंचायत मेहरबान तर नाही ना अशी सध्या नेरी शहरात जोरदार चर्चा महत्त्वाच नेरी शहरात मुख्य बाजार चौकात पुरुष-महीला यांच्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून नागरीकांची संडास बाथरुम ची मागणी आहे, मात्र नागरीकांच्या मागणीला नेरी ग्रामपंचायतनी केराची टोपली दाखवुन गावाच्या बाहेर संडासाचे बांधकाम केले आहे.नेरी शहरात मोठ्या मोठ्या कर्मचारी वर्गावर तसेच शाळेवर लाखो रुपयांचा कर थकीत आहे त्याकडे नेरी ग्रामपंचायत दुर्लक्ष करुन गोर गरीब शेतकरी कामगार यांना ग्रामपंचायत अंतर्गत कागदपत्रापासुन वंचीत ठेवुन जबरदस्तीने गरीबांकडुन कर वसुली केला जातो मग मोठ्या मोठ्या कर्मचारी व शाळेवर नेरी ग्रामपंचायत चा आशीर्वाद आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेरी ग्रामपंचायत अंतर्गत येनारे दुकानाचे गाळे शासनाच्या नियमाला डावलून नेरी ग्रामपंचायत नी एका एका व्यक्तीला दोन ते तीन गाळे दिले आहेत त्यातुन काही गाळे नेरी ग्रामपंचायत च्या आशीर्वादाने गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे गोरगरीब रोजीरोटी पासुन वंचीत आहे.
वार्ड नं ४ च्या नाल्या चोरीला गेल्या असुन आजही रस्ते व पुलाला नेरी ग्रामपंचायत ठीगर लाऊ लाऊ अपघाताला आमंत्रण देत आहे पाच ते सात वेळा रस्ते व पुलाची मोजनी केली असुन नागरीकांना लालीपाप दीला आहे मात्र रस्त्याच्या बांधकामाचा पत्ताच नाही वार्ड नं ४ मेंबर जोमात नागरीक कोमात अश्या विविध समस्यांनी ग्रासलेल्या नेरी ग्रामपंचायतला 14 मार्चला 2022 ला नेरी शहराती विविध समस्या प्रहार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे नेरी ग्रामपंचायत च्या लक्षात आनुन दिल्या होत्या मात्र त्या समस्याचे निवारन न करता नेरी ग्रामपंचायतने प्रहार च्या निवेदनाला केराची टोपली दाखवुन नेरी ग्रामपंचायत नी चक्क झोपेचे सौग घेतले आहे त्या झोपेचे सौग घेतलेल्या नेरी ग्रामपंचायत ला प्रहार संघटने मार्फत बेशरमीचे झाड़ लाऊन गावात दिंडी काढून येत्या 15 तारखेला नेरी ग्रामपंचायत च्या पुढे पेंढाल टाकुन बेमुद्दत आमोरन उपोशनाला आम्ही बसनार आहोत
