लोकशाही मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

लोकशाही मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न

उपसंपादक संदीप म्हस्के

9637066118



लोणार:- लोणार व मेहकर तालुक्यातील लोकशाही मराठी पत्रकार संघाची

बैठकीचे आयोजन लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे दि. २८ मार्च रोजी करण्यात आले होते .यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर,

हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख वक्ते म्हणून लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक सचिन खंडारे हे होते

तर प्रमुख अतिथी म्हणून

माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य के के तेजनकर लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव विष्णू नवघरे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार सतीश तेजनकर यांनी केले,

लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक सचिन खंडारे यांनी पत्रकाराची भूमिका स्पष्ट केली,त्यानंतर लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांनी पत्रकारिता करताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे व कशाप्रकारे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन करुन लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या तालुका निहाय बैठका घेऊन पत्रकार बांधवांसाठी संघर्ष करणार असल्याचे मत व्यक्त केले.

या बैठकीला 

मेहकर तालुक्यातून शिवाजी मोरे तालुका प्रसिद्धीप्रमुख लोकशाही मराठी पत्रकार संघ, तालुका संघटक रवींद्र सुरुशे, सिंदखेडराजा तालुका संघटक समाधान सरकटे, चिखली तालुका संपर्क प्रमुख राधेश्याम काळे,राजु किसन सरकटे, लोणार तालुक्यातील येथील सुभाष लोढे

लोणार लोकशाही मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद तेजनकर, सतीश तेजनकर, यांच्यासह मेहकर व लोणार तालुक्यातील पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सतीश तेजनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष लोढे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler