महाशिवरात्रीच्या पर्वावर पूजा फॉउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप..
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भुतकर मो.न.8308264808
स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर या गावात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी व्हावी गावातील एकही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच कोरोनासारखी महामारी आली तरी सुद्धा शिक्षणात कोणताही खंड पडू नये याच बरोबर विद्यार्थ्यांचा कलात्मक, व्यावहारिक, व्यक्तिमत्व विकास व्हावा आणी या देशाची येणारी पिढी सक्षम व्हावी हा दृष्टीकोन समोर ठेऊन दादापुर या छोट्याश्या गावात पूजा फॉउंडेशन ची स्थापना गावातील होतकरू विद्यार्थी अध्यक्ष कु. अमोल मो नन्नावरे, उपाध्यक्ष कु. अमोल ना बोधाने, सचिव आशिष क कुंभारे यांनी केली या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिल्या जाते याच बरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रम राबवून त्यांना पारितोषिक दिल्या जाते हा नाविन्यपूर्ण उपक्रम निश्वितच शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणेल अशी आशा पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मो नन्नावरे यांनी वर्तवली आले. या प्रसंगी गावातील सरपंच सौ विद्याताई खाडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सतीश कुंभारे, शिक्षक श्री प्रवीण निमजे, प्रवीण हजारे, पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मो नन्नावरे, उपाध्यक्ष अमोल ना बोधाने, सचिव आशिष क कुंभारे, अमोल लेडांगे, अक्षय बोधाने, अल्का चौधरी, रसिका नन्नावरे, नरेंद्र लेडांगे, आशिष लेडांगे , दिलीप बोधाने,प्रफुल लेडांगे पूजा फॉउंडेशन चे विध्यार्थी आणी समस्त गावकरी उवस्थित होते.....