चिमुर तालुक्यातील खांबाडा येथे सभापती लता पिसे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
प्रतीनीधी-प्रवीन वाघे,
चीमुर- खांबाडा गावांची विकासाची शाश्वती दिल्यानंतर नेरी पंचायत समिती क्षेत्राचे सभापती मा.सौ.लताताई पिसे यांनी दिनांक 11/03/2022 ला खांबाडा येथे 15 वित्त आयोग 10% पंचायत समिती स्तर निधी अंतर्गत विविध विकासकामाचे भूमिपूजन पार पाडले.
खांबाडा हे गाव वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीला अगदी लागून असून तपोभूमीकडे जाणारा मुख्य रस्त्यावरील हातपंपावर सौर पंप लावने, शौचालय व मुतारी बांधकाम तसेच शालेय शौचालय दुरुस्ती करणे च्या कामाचे उदघाटन करून मा. सौ. लताताई पिसे यांनी खांबाडा गावाच्या विकासात भर पाडण्याचे कार्य केले आहेत. आज केलेल्या उदघाटन कार्यक्रम 15 वा वित्त आयोग मधून घेण्यात आलेल्या या कामामुळे खांबाडा गावाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार असून गावातील जनजीवन सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे. या उदघाट्न प्रसंगी मा. सौ. लताताई पिसे, सरपंच मा. सौ. काजलताई नन्नावरे, उपसरपंच श्री. मंगेशभाऊ धाडसे, सदस्य अमोल गजभे, श्री. सुनीलजी कडवे, श्री. रामभाऊ चौखे, सौ. शामलता नन्नावरे, सौ. दुर्गाताई चौखे, सौ. वंदनाताई बावणे, सौ. सुनंदाताई खाटे, ग्रामसेवक पटले साहेब, श्री. ऋषीं पिसे, श्री. बंडू शेंडे, अशोक शेंडे, व ग्रामपंचायत कर्मचारी तथा ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.