श्री विठ्ठल रुक्माई मंदिर त्र्यंबक नगर येथे मंदिराचा कळस स्थापना.



दत्ता हांडे तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा

शहरातील त्र्यंबक नगर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त कलश स्थापना करण्यात आली

        त्रंबक नगर येथील सर्व रहिवासी यांनी मिळून त्रंबक नगर येथे नव्याने स्थापन झालेल्या श्री विठ्ठल रूखमाई मंदीर येथे दिनांक 1 मार्च महाशिवरात्री निमित्त कलश स्थापना पूजन करून मान्यवरांच्या व भक्त जणांचा उपस्थितीमध्ये मंदिराला कलश स्थापना करण्यात आली.

      शहरातील प्रसिद्ध असे जगदंब महाराज देव ऊपाध्ये यांनी कलश स्थापना पूजन  मान्यवरांच्या हस्ते करून घेतली .त्र्यंबक नगर येथील निवासी जनार्दन गोविंदराव पैठणे मंदिराचे मुख्य व्यवस्थापक यांनी स्वतः मंदिरासाठी जागा दान केली आहे त्यांच्या प्रमुख मार्गदर्शना मधे त्यांचा मुलगा गोवर्धन जनार्दन पैठणे यांच्या हस्ते कलश पूजन स्थापना करण्यात आली . या वेळेस संत मिराबाई भजनी मंडळ  व त्र्यंबक नगर येथील समस्त नागरिक यांची उपस्थिती होती महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अतिशय भक्तिमय वातावरणात महायज्ञ टाळ-मृदुंग भजनाचा गजर व महापूजा करून कलश स्थापना करण्यात आली या वेळेस श्री विठ्ठल रुक्माई व शिवलिंग याचे मूर्तीचे अभिषेक करून पूजन करण्यात आले . स्थापनेनंतर महाआरती झाली आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त त्र्यंबक नगर येथील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler