विधार्थ्याला घडविणारे व्यासपीठ म्हणजे रा.से.यो. - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

विधार्थ्याला घडविणारे व्यासपीठ म्हणजे रा.से.यो. - कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058


चंद्रपूर:- आनंद निकेतन  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दिनांक 20 मार्च  27 मार्च  या कालावधीत सोमनाथ,जिल्हा चंद्रपूर ता.मूल इथे यशस्वीरित्या संपन्न झाले. दिनांक 27 मार्च 2022 रोजी या  शिबिराचा समारोपीय कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोपीय समारंभात विशेष पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित होते.शिवाय डॉ.विजया गेडाम रासेयो जिल्हा समन्वयक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व सौ. पल्लवी आमटे कार्यकर्ता आनंदवन यांची विशेष उपस्थिती या समारंभाला लाभली. याप्रसंगी मारोडा गावचे सरपंच श्री.भिकारूजी शेंडे, उपसरपंच श्री. अनुप नेरलवार

व सदस्य श्री. बंडूजी गेडाम व सोमनाथ येथील कार्यकर्ते  उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व रासेयो स्वयंसेवकांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने झाली.सात दिवस चाललेल्या या संपूर्ण शिबिराचे अहवाल वाचन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.रंजना लाड यांनी केले. आपल्या अहवाल वाचनातून त्यांनी या सात दिवसात विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान, बौद्धिक सत्रातील विविध व्याख्याने,सांस्कृतिक कार्यक्रम ,रोज सकाळी निघणारी जागर दिंडी, संध्याकाळची प्रार्थना या सगळ्यांचा आढावा घेतला.आणि हे शिबीर रासेयो स्वयंसेवकामुळेच यशस्वी झाल्याचे मत व्यक्त केले.

               या समारोप प्रसंगाला विशेष अतिथी म्हणून आलेले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी या शिबिरात पाळलेल्या शिबिराच्या दिनचर्येचे कौतुक केले आणि पुढेही अशीच दिनचर्या पाळण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

        डॉ.विजया गेडाम रासेयो चंद्रपूर जिल्हा समन्वय ,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हंटले की, "अशा शिबिरांमधून  विद्यार्थ्यांचे स्वावलंबन, चारित्र्य, आत्मनिर्भरता हे गुण  वाढीस लागतात". मागील दोन वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील रासेयोच्या स्वयंसेवकांनी समाजकार्य केल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले. कोल्हापूर, सातारा पुरग्रस्ताचा वेळी गोंडवाना विद्यापीठाने एकुण पंधरा ट्रक धान्य जमा केले व कोरोनाच्या काळात ही  गोंडवाना विद्यापीठाने उत्तम कामगिरी बजावली. म्हणूनच महाराष्ट्र शासनाचा गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.त्यांनी एवढ्या उन्हात विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे याप्रसंगी कौतुक केले .

      महारोगी सेवा समिती आनंदवनच्या कार्यकर्त्या सौ. पल्लवी आमटे यांनी हे शिबिर अतिशय उत्तम रित्या पार पाडल्याबद्दल सर्व रासेयो स्वयंसेवकाचे व  महाविद्यालयातील संपूर्ण टीमचे कौतुक केले.आणि सात दिवस मलाही या शिबीराचा भाग होता आले याचा आनंद व्यक्त केला.या प्रसंगी  दरवर्षी सोमनाथ येथे होणाऱ्या श्रमसंस्कार छावणी ची ही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

      ग्रामपंचायत मारोडाचे सरपंच मा. श्री. भिकारुजी शेंडे यांनी विद्यार्थ्यांना या शिबिराच्या माध्यमातून चांगले विचार आत्मसात करण्याचे सांगितले व अभ्यासा सोबतच समाजासाठी काहीतरी कार्य करत राहण्याचे आव्हान केले.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी ही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

कार्यक्रम अधिकारी व शिबिर प्रमुख तसेच सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वंयसेवक यांच्या मेहनतीमुळेच हे शिबीर यशस्वी होऊ शकले असे मत व्यक्त केले.

     या समारोपीय कार्यक्रमात या सात दिवसात आलेल्या अनुभवा बाबत काही विद्यार्थ्यांनी मनोगतेही व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हितेश घुगल व कु.निकिता मानुसमारे यांनी केले.

आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले

या समारोपीय कार्यक्रमाला डॉ.तक्षशिल सुटे, प्रा. अरविंद ढोके,डॉ.अशोक मिस्त्री, प्रा. मोक्षदा नाईक, डॉ.निलेश ऊगेमुगे, डॉ.धनश्री पंचभाई,प्रा. मानसी काळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler