विकलांगाना दिव्यांगांना मोटेगाव ग्रामपंचायत अंतर्गत 5 टक्के निधीतुन जर्मन गंज झाकणी वितरित

विकलांगाना दिव्यांगांना मोटेगाव  ग्रामपंचायत अंतर्गत  5 टक्के निधीतुन जर्मन गंज झाकणी वितरित


प्रतिनिधी-प्रवीन वाघे

मो,7038115037



नेरी।येथून जवळच असलेल्या मोटेगाव  येथे अपंग व दिव्यांग लाभार्थ्यांना अपंगांच्या राखीव वित्त आयोग व इतर निधीतून 5 टक्के निधीतून दिनांक 25 मे ला ग्रामपंचायती च्या आवारात 11 लाभार्थ्यांना  मोठा जर्मन गंज व झाकणी वितरित करण्यात आले 

     मोटेगाव येथील कर्तव्यदक्ष सरपंच सुभाष नेवारे यांनी  दिव्यांग व अपंग लाभार्थ्यांच्या घरपयोगी साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि 5 टक्के निधीतून 11 अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना जर्मन गंज व झाकणी वितरित करून घरगुती वापरासाठी  नेहमी कामात येणारे साहित्य वितरित केले तसेच अंगणवाडी येथील बालकांचे वजन मोजण्याचे नियंत्रण साहित्य सुद्धा वितरित करण्यात आले 

               या साहित्य वितरण कार्यक्रमाला  सरपंच सुभाष नेवारे सचिव रंजना वाघमारे उपसरपंच चंदू  रामटेके ग्रामपंचायत सदस्य मधुकर दडमल. अर्चना नेवारे. अर्चना सुकारे. वनिता घोडमारे. माधुरी भानारकर. सुशीला खोब्रागडे. अंगणवाडी सेविका शेवंता नेवारे करिश्मा मेश्राम  लिलाबाई नेवारे  मदतनीस सारुबाई घोडमारे नंदिनी खवसे  बांबोडे बाई तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तेजराम इंगुळकर. रत्नाकर दडमल. ऑपरेटर सचिन बांबोडे या सर्वांच्या उपस्थितीत व विकलांग अपंग  लाभार्थी आणि गावकरी समक्ष साहित्याचे वाटप ग्रामपंचायत कार्यालय मोठेगाव येथे करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler