उपोषण करते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी उपोषणाच्या ४दिवशी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष लेखी आश्वासन..
मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा
नगरपरिषद प्रशासन देऊळगाव
राजा (जि.बुलढाणा) येथे सध्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी संगनमत करून नियम बाह्य वेतननिश्चिती व नियम बाह्य वेतन वाढ लागू करून शासनाची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या न.पा.कर्मचाऱ्यांकडून अपहरित झालेली रक्कम एक रकमी वसूल करून संबंधितांविरुद्ध चौकशी अंती गुन्हे दाखल करावे तसेच स्थानिक निधी लेखा परीक्षा बुलडाणा यांनी करण्यात आलेल्या लेखा परिक्षणा मध्ये आस्थापना विषयक बाबी ची तपासणी व लेखापरीक्षण न करुण आपल्या कर्तव्यात पालानात कसूर केल्याने लेखापरीक्षक बुलढाणा विरुद्ध गंभीर स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी या मागणी साठी जिल्हाअधिकारी कार्यालय समोर महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार विजेते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी दि.17/05/2022 पासून जिल्हाधिकारी कार्यलय बुलढाणा समक्ष आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या मुद्द्यांनुसार शासकीय कर्मचारी यांनी शासनाने जेव्हा सहावा वेतन आयोग लागू केला त्या आयोगाच्या शिफारशी मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला आगाऊ व जास्तीचे नियमबाह्य वेतन वाढ अदा करण्यात येणार नाही असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा नगरपरिषद प्रशासन देऊळगाव राजा मधील शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला आहे व संबंधित कर्मचाऱ्यांना जास्तीची वेतनवाढ स्वतः लागू करुण शासनाला करोडो रुपयांचा चुना लावलेला आहे शासनाची फसवणूक करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी कर्मचारी अधिकारी यांच्याकडून एक रकमी वसूल करण्यात यावी असे उपोषण करते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी उपोषणाच्या 4 दिवशी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष चर्चेअंती लेखी आश्वासन नंतर उपोषणाची सांगता करण्यात आली
