आनंद निकेतन महाविद्यालयात 750 शिबिरार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी 22 दिवसीय क्रीडा व योग समारोप

आनंद निकेतन महाविद्यालयात 750 शिबिरार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी 22 दिवसीय क्रीडा व योग  समारोप


जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058



वरोरा:- महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दिनांक 20 एप्रिल ला जर्मनीच्या श्री रॉल्फ यांच्या हस्ते करण्यात आले होते.22 दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप समारंभ दि.10 मे ला मोठ्या उत्साहात पार पडला.या समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून महारोगी सेवा समिती,आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, विशेष अतिथी म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, 

संत गाडगे बाबा ,अमरावती विद्यापीठ चे संचालक डॉ. अविनाश असणारे,आणि प्रमुख पाहुणे म्हणून VNIT नागपूर चे डॉ.दिलीप पेशवे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने तसेच महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आणि प्रमुख कार्यकर्ते डॉ. विजय पोळ, श्री सुधाकर कडू, सौ. पल्लवी आमटे, कार्यकर्ते, सौ. समीक्षा आमटे, श्री. उमेश गुलक्षे,शिबीर संयोजक या सर्व पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये 22 दिवस अविरत पणे पेटत असलेल्या मशालीची ज्योत शांत करून तसेच शिबिराच्या ध्वजाचे ध्वजाअवतरण करून या तिसऱ्या योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभाला सुरुवात झाली.

             शिबिरातिल सर्वात लहान वयोगटातील शिबिरार्थांच्या घुंगरू काठी कवायती पासून प्रात्यक्षिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर बघणाऱ्याचे डोळे स्तब्ध होतील अश्या भारतीय पारंपारिक क्रीडा प्रकारातील प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये घुंगरू काठी, सोबतच डंबेल्स,लाठी बंदिश,योगा, लाठी ,कराटे, लेझीम, दंडबैठक अश्या प्रकारच्या कवायती आणि चित्तथरारक अश्या जळती बनेटी, जोडी कवायत , पुरलेला मल्लखांब, रोप मल्लखांब, टांगता मल्लखांब याचे सुद्धा प्रात्यक्षिक शिबिरार्थ्यांनि केले.

    या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग ,अमरावती विद्यापीठ संचालक डॉ. अविनाश असणारे यांचा उपस्थित सर्व पाहुण्याच्या हस्ते आनंदवनातीलच टाकाऊ वस्तू पासून बनवलेल्या भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

   याप्रसंगी बोलताना डॉ.अविनाश असणारे यांनी या शिबिराचे खूप कौतुक केले.या डिजिटाजेशच्या युगात मोबाईल च्या आपण अति आहारी चाललो आहेत,पण खेळ मात्र आपल्याला यातून बाहेर काढू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी त्यांनी शिबिरार्थी यांच्या पालकांचे विशेष कौतुक केले.आणि या शिबिराच्या माध्यमातून लवकरच उत्तम दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

    या तिसऱ्या योग व क्रीडा शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून ज्यांनी आपली भूमिका बजावली,तसेच हे सर्व शिबीर प्रा. तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत पणे काम करून ज्यांनी सांभाळले असे शिबिर संयोजक श्री. उमेश गुलक्षे, सहसंयोजक विद्यार्थी प्रमूख महेश सोनावने,ओमकार चट्टे आणि  एकूण सर्व 60 प्रशिक्षक यांना सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

   आनंदवन च्या कार्यकर्त्या पल्लवी आमटे यांनी अगदी योग्य वयात मुलं या शिबिरात आल्याचा आनंद व्यक्त केला. मुलांनी व पालकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला खेळ थांबू नये असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले आणि या संपूर्ण शिबिराचे, संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन ही केले.

      अध्यक्षीय समारोप करताना डॉ. विकास आमटे यांनी देखील महाविद्यालयाचे, संपूर्ण  शिबिराचे कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

    या समारोपीय कार्यक्रमामध्येच शिबिरात सहभागी असणाऱ्या अर्णव हटवार,वेदांत सातपुते,कुणाल आसुटकर आणि ततस्वी घागी,शरवरी मिटकर,अक्षदा पिसाळ या सर्वांना उत्कृष्ट शिबिरार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी 750 शिबिरार्थी, 60 प्रशिक्षक,1000 पालक व क्रीडा प्रेमी अश्या जवळपास 1800 ते 2000 लोकांची उपस्थिती होती.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तानाजी बायस्कर आणि महेश सोनावणे यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रा. तानाजी बायस्कर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler