नवरदेव नवरी लग्न मंडपात पोहचताच अईन वेळेवर लग्नाला साफ नवरीचा नकार.

नवरदेव नवरी लग्न मंडपात पोहचताच अईन वेळेवर लग्नाला साफ नवरीचा नकार.

वाजत गाजत आलेल्या नवरदेवाला,आल्या पावली जावे लागले परत,

चिमुर तालुक्यातील कोलारी येथील घटना, 

चिमुर प्रवीण वाघे

मो,7038115037




बैंडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव वरहाडयासहित लग्न मंडपी आला, परंतु एनवेळी भर मंडपात वधु मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जाव लागले,  ही घटना चिमुर तालुक्यातील शंकरपुर जवलील कोलारी येथे मंगलवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली, 

          चिमुर तालुक्यातील उसेगाव येथील एका युवकाचे नागपुर येथील एका युवती सोबत लग्न जुळले, थाठामाठात साक्षगन्धही झाले, मुलीच्या आजोबाच्या गावी कोलारी येथे लग्नकार्य उरकायचे असे बैठकीत ठरले, त्यानुसार कोलारी येथे लग्न होणार होते, त्यासाठी नवरदेव आपले वरहाडी घेऊन लग्न मंडपी हजर झाला, त्या मंडपात येताना ढोल तास्याच्या गजरात आणि मित्र मंडळीच्या नाच गांनयाने नवरदेव सहजीवनाचे स्वप्न रंगवत आनंदाने वधु मंडपी आला, लग्न मुहूर्तवर लावायचे असल्याने नवरी मुलगिही मंडपी आली, आता मंगलाष्टक होणार एवढ्यात मंडपात मुलीला चक्कर आल्याने ती खाली कोसळली, त्यामुळे लगेच तिला दवाखान्यात नेन्यात आले, दवाखान्यात शुद्धिवर आल्यानंतर मात्र नववधूने लग्न मंडपी जाण्यास नकार दिला आणि मला त्यामुलासी लग्न करायचे नाही असे स्पष्टीकरण घरच्या मंडलीना सांगू लागली, बऱ्याच जनानी व नातेवाहिकाना तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु नवरी मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती, दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्न मंडपी आली नाही, त्यामुळे नवरदेवाकडील वरहाडयामधे कुजबुज सुरु झाली, अखेर नवरिच्या नातेवाईकाकडून मुलीचा लग्नास नकार आहे, असे स्पष्टीकरण नवरदेव व त्यांच्या वरहाडयास सांगण्यात आले, त्यामुळे वधु मंडपी तनावाचे वातावरण निर्माण झाले, नवरया मुलाने यावर तोड़गा काढावा म्हणून तंठा मुक्त समिती कड़े अर्ज सादर केला, तंठा मुक्त समितिनेही तातडीची बैठक बोलाऊन यावर तोड़गा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु टंटा मुक्त समिति समोर मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर मुलाला आल्या पावली परत जावे लागले,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler