रस्त्यात दगड कि दगडात रस्ता

रस्त्यात दगड कि दगडात रस्ता

महादवाडी गावाला अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा

गाव तसा चांगला पण रस्त्याने नडला

मागील 25 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती नाही

अनेक लोकप्रतिनिधी ना मागणी करूनही रस्त्याकडे दुर्लक्ष - सरपंच भोजराज कामडी यांचा आरोप


प्रतिनिधी नेरी। प्रवीन वाघे,

मो,7038115037


चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी ला लागून असलेल्या महादवाडी या गावात जाण्यासाठी रस्त्याची दशा आणि अवदशा झाली असून मागील 25 वर्षांपासून या रस्त्याची  दुरुस्ती सुद्धा झाली नसून संपूर्ण गिट्टी डांबर उखळून मोठमोठे गड्डे पडले आहे या संदर्भात सरपंच भोजराज कामडी यांनी रस्ता दुरुस्ती बदल अनेक लोकप्रतिनिधीना निवेदन देऊन साखळे घातले परंतु अजूनपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही असा आरोप सरपंच यांनी केला आहे

                सदर  महादवाडी गाव हे नेरी नवरगाव मार्गावरून 3 की मी अंतरावर असून गतवैभव प्राप्त गाव आहे या गावात हजारो वर्षांपूर्वी बांधलेला हेमाडपंथी मंदिर आहे  सर्व सुख सोयी आहे परंतु  हाच मुख्य रस्ता पार उखळून गेला आहे त्यामुळे रहदारी करण्यास अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे शाळेतील मुलांना सायकल तसेच पायदळ चालणे सुद्धा मुस्किल झाले आहे एवढा भयंकर दुर्दशा या रस्त्याची झाली आहे वाहने चालवताना नाहक त्रास सहन करून चालवावी लागत आहे वाहन कुटून न्यावे आणि कसे न्यावे असा यक्ष प्रश्न निर्माण होत आहे

       सदर गावाला महिलांनी राज्यात नावारूपास आणून प्रसिद्धी दिली आहे येथील महिला कबड्डी संघाने सत्यमेव जयते या कार्यक्रमात अववल स्थान प्राप्त करून दिले होते असा हा नावलौकिक प्राप्त गाव रस्त्यामुळे मागासलेला झाला आहे तसेच सभोवतालचे गावात येणारे रस्ते सुद्धा माती गिट्टीचे कच्चे रस्ते आहेत त्यामुळे गाव हा विकासापासून वंचित ठरत आहे तेव्हा या रस्त्याबद्दल सरपंच कामडी यांनी रस्ते अवजड वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी जिल्ह्याचे पालकमंत्री आंमंदारसाहेब जिल्हा परिषद गटनेता जी प सदस्य संवर्ग विकास अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे परंतु रस्ता जैसे थे आहे कुणीही या रस्त्याकडे लक्ष दिले नाही आहे तेव्हा संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधी नी लक्षं देऊन रस्ता दुरुस्त करून द्यावे अशी मागणी भोजराज कामडी सरपंच यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler