आमदार पांदण शेत रस्ताच्या निधीचा गैरवापर -- .

 .आमदार पांदण शेत रस्ताच्या निधीचा गैरवापर -- .

. सरकारी नकाशाच्या आधारे शेत रस्ता न घेता वहिवाट / पानतास रस्त्यावर केला खर्च . 

        . शेतकऱ्यांमध्ये वाद उफाळला . 

-----------------------------------------------------






मयुर मोरे बुलढाणा जिल्हा सहसंपादक 

मेरा बु , ता . चिखली : -  आमदार पांदण  रस्ते या निधी मधून मेरा बु शिवारातील भाग २ मधील वाडी शिवारात आमदार पांदण निधी हा शेत नकाशा वरील दिशा प्रमाणे शेत रस्ता न करता या पांदण शेत रस्त्याच्या निधीचा गैरवापर करुण वहिवाट असलेल्या पानतास रस्तावर खर्च केल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण केला अशी तक्रार दिपक सोळंकी व संतोष सोळंकी यांनी केली आहे .    . 

 तक्रारी मध्ये नमूद केले आहे की मेरा बु  भाग २ मध्ये वाडी शिवारात असलेल्या गट २४९ , २४७, २४८ , ३७२ , मधून सरकारी नकाशा प्रमाणे शेत रस्ता दाखविण्यात आला आहे . मात्र गावातील शेता शेजारी असलेले शेतकरी दतात्रय दगडुजी पडघान  , मदन राधाकृष्ण पडघान , ज्ञानेश्वर बाळाजी पडघान , बद्रीप्रसाद दतात्रय पडघान , सर्जेराव पडघान यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदर शेत रस्ता नकाशा प्रमाणे न करता जबरदस्तीने  गट गट २४८ व ३७१ मध्ये वहिवाट / पानतास रस्त्यावर खर्च करून निधीचा गैरवापर केला . सुरवातीला या रस्त्यावरून शेतकरी संतोष सोळंकी व दिपक सोळंकी यांनी प्रेमा पोटी आजू बाजूच्या व समोरच्या शेतकऱ्यांना जावू देत होते . याचाच गैरफायदा घेवून सरकारी शेत नकाशा वरील मुख्य रस्ता सोडून वहिवाट/पानतास रस्त्यावर काम केले आणि वाद होण्याच्या उद्देशाने रस्त्याला दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी नाल्या काढल्या नाही त्यामुळे पावसाचे पाणी शेतात फुटून शेताचे मोठे नुकसान होत आहे . या रस्त्यावर गाडी बैल जाण्याचा रस्ता असतांना सुध्दा वरील शेतकऱ्यांनी आमचे नुकसान होण्याच्या उद्देशाने शेत रस्ता नकाशा प्रमाणे न करता वहिवाट/पानतास रस्त्यावर खर्च केला आहे , त्यामुळे या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तहसीलदार चिखली यांच्याकडे शेत रस्त्या बाबत प्रकरण सुरू असल्याने तहसीलदार येळे यांनी घटनास्थळी येवून पंचासमक्ष पंचनामा सुध्दा केला होता तसेच मंडळ अधिकारी सोनुने जाधव तलाठी जाधव , पऱ्हाड यांनी घटनास्थळी येवून पंचनामा करुण सदर अहवाल मध्ये नमूद केले की भूमिअभिलेख एकत्रीकरण पुर्वीचे गाव नकाशा प्रमाणे मेरा बु ते रताळी रस्त्याचे खडीकरण मेरा बु ते सा खेर्डा रोड पासून मेरा बु शिवारा पर्यत झालेले आहे सदर रस्ता गट न २३२ चे दक्षिण धूऱ्याने व पूर्व बाजूने दक्षिण उत्तर कोपऱ्यातून उत्तरे कडे गट न २४५ ,२४६,२४१ मधून रताळी कडे जातो त्यामध्ये असे दिसून आले की सदर रस्ता हा गाव नकाशावर नाही व तो अडविलेला नाही , त्यामुळे हा रस्ता नकाशा वरील दाखविलेल्या दिशा प्रमाणे केल्यास संतोष सोळंकी व दिपक सोळंकी यांची काहीही हरकत नाही मात्र वहिवाट/पानतास रस्त्यावर फक्त गाडी बैल जाण्याचा रस्ता आहे आणि तो आज रोजी खुला आहे परंतु बाजूच्या शेतकऱ्यांने रस्ता अडविल्यास आम्हाला जबाबदार धरू नये असे तक्रारी मध्ये नमूद आहे .यावेळी घटनास्थळी माजी सरपंच सुनिल पडघान , तलाठी जाधव , पऱ्हाड , राजू पाटील , संतोष सोळंकी , बाळू पाटील , दिपक सोळंकी , आदी जण उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler