आनंद निकेतन महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

आनंद निकेतन महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल


जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर

गणेश उराडे 8928860058



   वरोरा:- नुकताच जाहीर झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत आनंद निकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले.

विज्ञान शाखेचा निकाल ९८.०३ 

कला शाखेचा निकाल ६९.७४

वाणिज्य शाखेचा निकाल ७९.०५

विज्ञान शाखेत कु.सिमरन रामकृष्ण दातारकर ८७.८३ % घेऊन प्रथम आली आहे.

कला शाखेत नकुल विजय गोवर्धन ७८.३३% घेऊन प्रथम आला आहे.

वाणिज्य शाखेत राहूल रविंद्रसिंग मुसावत हा ९०.६७% घेऊन प्रथम आला.मराठी वाणिज्य शाखेतून समीक्षा गावंडे ७९.१७% घेऊन प्रथम आली आहे.

सर्व गुणवत्ता प्राप्त तथा यशस्वी विद्यार्थ्यांचे महारोगी सेवा समितीचे सचिव मा. डॉ. विकास आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्या मा. राधा सवाने व सर्व शिक्षकांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler