. अखेर चिखली पंचायत समितीला कायमस्वरूपी बीडीओ सावळे रुजू होणार .
मयुर मोरे बुलढाणा जिल्हा उपसंपादक
चिखली : - जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मिनीमंत्रालय समजल्या जाणाऱ्या चिखली प.स.च्या बिडीओ पदाला गेल्या एका वर्षांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागले होते . त्यामुळे एका वर्षात एकापाठोपाठ आठ बीडीओनी प्रभारी पदभार स्विकारावा लागला आणि काही महिन्या भरातच सोडून द्यावा लागला हा भोंगळ कारभार वारंवार बातम्या प्रकाशित करून प्रकार उघडकीस आणला होता त्यामुळे संबंधित वरीष्ठ अधिकारी वर्गांनी तात्काळ दखल घेऊन अखेर चिखली प.स. ला कायमस्वरूपी बिडीओ म्हणून सावळे हे ८ जून रोजी पदभार घेणार आहेत .
बुलढाणा जिल्ह्यातील १४० गावाचा समावेश असलेल्या चिखली प.स.वर्ग ( अ ) च्या सदस्यांची संख्या १४ असून या प.स. चा कारभार दोन बीडीओ पदभार सांभातात .त्यामुळे या प.स. विस्तार मोठा असल्याने दररोज ग्रामीण भागातून विविध खाजगी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ राहते .तसेच या तालुक्यात विविध वेगवेगळ्या पक्षनेते मंडळीची एकमेकात मोठी स्पर्धा आहे .चिखली तालुक्यावर भाजपच्या आमदारांचे वर्चस्व आहे मात्र या पंचायत समितीचा कारभार प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या एका वर्षांपासून कायमस्वरूपी बिडीओ न देता प्रभारी दोन बीडीओ पदभार सांभाळतात . मात्र अशा या नावाजलेली तालुक्याला अगोदर गटविकास अधिकारी म्हणून भुजबळ हे काम पाहत असतांना त्यांची प्रशासकीय झाली आणि त्यांच्या ठिकाणी सहाय्यक बिडीओ असलेले जायभाये यांच्याकडे पदभार सोपविला तेही एक दोन महिन्यांतच आजारी रजेवर निघून गेले असल्याने पुन्हा विस्तार अधिकारी वाघ यांच्याकडे बीडीओचा प्रभारी पदभार देवून खुर्चीवर बसविले . पदभार हाती घेताच कार्यालयात अंतर्गत वाद उफाळला आणि प्रशासनाला त्याचा पंधरा दिवसाच्या आतच पदभार काढवा लागला . आणि त्याठिकाणी दे राजा येथील बिडीओ इंगळे यांच्या कडे पदभार सोपवावा लागला . परंतु इंगळे रुजू होताच त्यांनाही प्रशिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यात जावे लागले असल्याने प्रशासनाला पुन्हा बुलडाणा प.स.चे सहाय्यक बिडीओ भरत हिवाळे यांच्याकडे पदभार दिला . सुरळीत कामकाज सुरू असताना पुन्हा हिवाळे यांचा पदभार दोनच दिवसात काढून घेवून त्यांच्या ठिकाणी बिडीओ म्हणून रजेवर गेलेले सहाययक बिडीओ जायभाये यांना रुजू केले अशा या प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या नऊ ते दहा महिन्यात एका पाठोपाठ सात प्रभारी बिडिओ नी पदभार घेतला अन सोडून द्यावा लागला. त्यामुळे एका पाठोपाठ रुजू झाले आणि पदभार घेवून बाहेर तालुक्यात गेले गटविकास अधिकाऱ्यामध्ये बी टी जायभाये हे दिनांक ७ नोव्हेंबर २०१९ ते २७ नोव्हेंबर २०१९ , बी जी वाघ , २७ नोव्हेंबर २०१९ ते २३ जानेवारी २०२० , एस एस इंगळे २४ जानेवारी २०२० ते २७ जानेवारी २०२० , व्ही बी हिवाळे २८ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२० , बी जी जायभाये ०१ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२० , एस जी कांबळे ०२ मार्च २०२० ते १२ जुलै २०२०, खामगाव प.स. चे बीडीओ जाधव हे १३ जुलै रोजी रुजू झाले आणि काही महिने पदभार सांभाळत असतांना बुलढाणा सहाय्यक बीडीओ हिवाळे यांच्याकडे पुन्हा दिनांक २७ मे ला पदभार सोपाविला . हिवाळे हे कारभार पाहत असतांना त्यांनी २४ जानेवारी ते ८ फेब्रुवारी पर्यत आजारी रजा घेतली त्यामध्ये मेहकर प.स. चे सहाय्यक बीडीओ जाधव यांच्याकडे पदभार दिला आहे . आजारी रजेवर गेलेले सहाय्यक बीडीओ हिवाळे हे दि ८ फेब्रुवारी २०२२ ला चिखली प.स. ला रुजू झाले आज पर्यत जाधव हे प्रभारी पदभार पाहत आहेत हा प्रशासनाचा भोंगळ कारभार दै देशोन्नतीने वारंवार बातम्या प्रकाशित करुण जनतेसमोर उघडकीस आनला होता त्यामुळे बिडीओ जाधव यांची प्रशासकीय बदली करुण त्याठिकाणी अमरावती जि.प. अंतर्गत असलेल्या अचलपूर प.स.चे बिडीओ सावळे यांच्याकडे चिखली प.स. चा कायमस्वरूपी पदभार सोपाविला त्यामुळे आता चिखली प.स. ला कायमस्वरूपी दोन बीडीओ लाभल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे
