*तहसील कार्यालय देऊळगाव राजा देऊळगाव राजा तालुक्यात आजी माजी सैनिकांची बैठक पार पडली*
. भिमराव चाटे शहर प्रतिनिधी देऊळगाव राजा.
स्वातंत्र्याच्या 75व्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत जवान योजनेअंतर्गत आजी माजी सैनिकांच्या समस्या अडचणी सुविधा साठी तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी ठाणेदार साहेब सह माजी सैनिकांना घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आल्या.
या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी माजी सैनिकांचे प्रश्न समस्या अडचणी सुझाव मांडले जातात.
आज 21 जून 2022 मंगळवार ला चार वाजता नायब तहसीलदार प्रीती जाधव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक सभा भरली होती, त्यामध्ये सैनिकांची शेत रस्त्याचे प्रकरण, शासन निर्णयाप्रमाणे सैनिकांना जमीन मिळण्याचे प्रकरण, शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना शासन निर्णयाप्रमाणे न्याय मिळावा यासाठी क्लर्क स्टाफ व सैनिकांची साधकबाधक चर्चा व्हावी असे माजी सैनिक सर्जेराव गाडेकर साहेबांनी विचार मांडले. सुरज मल ढाकणे साहेबांनी संघटनेच्या ऑफिस करता जागेबाबत पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करत चर्चा केली प्रत्येक आजी-माजी सैनिकाने सैनिक संघटनेच्या ऑफिसमध्ये रजिस्टर मध्ये नोंद करून महिन्याभरात एक सोबत तहसीलदार साहेबांकडे सर्व प्रकरण सादर करावे असे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव चाटे साहेब म्हणाले, ई क्लासच्या अतिक्रमित शेतीतून शंभर फूट अडवलेल्या पाईपलाईन बाबत न्याय मिळावा असे सैनिक मित्र भिमराव चाटे म्हणाले, सर्वांनी दिलेल्या समस्या अडचणी चे विनंती अर्ज नायब तहसीलदार प्रीती जाधव मॅडम यांनी नोंद करून घेतली. आणि तहसीलदार साहेबांसोबत व संबंधितासोबत चर्चा करून तात्काळ माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावू असे म्हणाल्या.
यावेळी सैनिक संघटना पदाधिकारी भीमराव उबाळे साहेब सुरजमल ढाकणे साहेब, रमेश शेरे साहेब सर्जेराव गाडेकर साहेब रामराव सरोदे साहेब बाबासाहेब खरात देवलाल ढवळे माजी सैनिक मित्र भिमराव चाटे आदी तालुक्यातील माजी सैनिक बैठकीस होते .
देशभरात अग्निविर सैन्य भरती विषयी अग्निपथ झाले, त्यात दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा हात होता. अग्नीविर योजना सकारात्मक दृष्टिकोन ने लक्षपूर्वक पाहिले तर खूप छान आहे.
हे तिन्ही सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करून अमलात आणण्याचे ठरवले आहे . ही योजना कोणी पॉलिटिकल लीडर ने डिझाईन केलेली नसून जागतिक लेव्हलचा विचार करून आर्मी नेव्ही एअरफोर्स स्वीकार केली आहे अन्यथा सुरुवातीला सैन्याकडून विरोध झाला असता.
गावाकडे माजी सैनिकांना सहज लोक विचारतात सोशल मीडियावर एवढा विरोध चालला आहे तुमचे काय मत आहे तर प्रत्येक माजी सैनिक अग्निविर योजनेचे समर्थन करतात व 17 ते 23 वयाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून सैन्यभरती च्या प्रॅक्टिस साठी प्रोत्साहित करतात .
17 ते 23 या वयाच्या कोणत्याही मुलांनी सरकारी संपत्ती स हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये.
एखादा दगड उचलून सरकारी संपत्ती ची तोडफोड किंवा जाळपोळ करतानाच्या व्हिडिओ चित्रीकरण यामध्ये अडकलेले अग्निविर यांची ट्रेनिंग नंतर सुद्धा शपथविधी साठी अडचण येईल.
पोलीस व्हेरिफिकेशन होणार नाही त्यांना भरतीपूर्व कोणत्याही आंदोलनात सहभागी नसल्याचे तसे प्रमाणपत्र द्यावे लाग णार आहे .अशी साधक-बाधक चर्चा माजी सैनिक मित्रांमध्ये झाली. जय हिंद.
