अंगणवाडी सेविकेने सरकारी माल केला गडप पालकांना दिला खताच्या थैली मध्ये कंट्रोल चा माल
आबमक्ता येथील अंगणवाडी सेविकेचा प्रताप
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- तालुक्यातील आबमक्ता येथील अंगणवाडी सेविकेने सरकारी धान्यात अफरातफर करून विधार्थ्यांना कंट्रोल चा माल खाताच्या थैलीत देण्याचा प्रकार पालकाच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी एकच गर्दी अंगणवाडी मध्ये केली जो पर्यंत कार्यवाही होत नाही तो पर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला पंचायत समिती वरोरा चे अधिकारी येऊन संबधित प्रकरणाची चौकशी करून दोषी अंगणवाडी सेविका आणी परिचालिका यांच्या वर योग्य ती कार्यवाही करू असे आश्वसन संबंधित अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले
हे पहिले प्रकरण नसून या आधी अंगणवाडी सेविका आणी परिचालिका यांनी अन्नधान्यात अफरतफर केली आणी पालकांनी विचारणा केली असता त्यांना उलटसुलट उत्तर त्यांना देण्यात आली असे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले
पंचायत समिती चे अधिकारी या प्रकरणातील संबंधितावर कोणती कार्यवाही करतात यांच्या कडे गावकऱ्याचे लक्ष लागले आहे