नेरी येथील मध्यवर्ती तलावातील शेकडो मासोळ्या विषबाधेने मृत्युमुखी
मृत मासोळ्या च्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त ,सूचना देऊनही ग्रामपंचायत मस्त
अज्ञात इसमाने विष प्रयोग करून शेकडो मासोळ्या चे घेतले प्राण - गावकऱ्यांचा संशय
प्रतिनिधी नेरी। प्रवीण वाघे
मो,7038115037
सविस्तर वृत्त असे की नेरी येथे मोठे मध्यवर्ती तलाव असून या तलावामुळे शेतकऱ्यांना गावातील नागरिकांना महिलांना पाण्याचा उपयोग होत असून उदरनिर्वाह होत आहे तसेच या तलावातील मुबलक पाण्यामुळे धिवर समाज बांधव तलावात मच्छिमार चा व्यवसाय करून आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत कुटूंबाचा गाळा हाकतात अनेक वर्षापासून त्यांची या तलावात मालकी हक्क असून त्यांच्या व्यवसाय सुरू आहे मोट्या गुणिगोविंदाने ते व्यवसाय करीत असताना त्यांच्या या व्यवसायाला कुणाची तरी नजर लागली आणि काल रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला एका अज्ञात इसमाने तलावात विष प्रयोग करून लाखो रुपयांचा मासोळ्या ठार केल्या यामुळे मच्छिमार बांधव यांच्यावर कुऱ्हाड कोसळली असून त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे सदर विष प्रयोग अज्ञात इसमाने आकसापोटी केले असल्याचे संशय नागरिक आपापसात करीत आहेत असे बोलले जात आहे. या मृत मासोळ्याने गावात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले असून घटस्थळी शेकडो गावातील महीला व पुरुशा॓नी मासोळ्या बघन्याकरीता गर्दी केली असुन नेरी ग्रामपंचायत ला माहिती देऊनही कोणी घटनास्थळी दाखल झाले नाही आणि दखल सुद्धा घेतली नाही. तेव्हा सदर बाबीची संबंधित विभागाने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून अज्ञात इसमाचा शोध घेऊन मच्छिमार बांधवांना न्याय मिळवून द्यावा आणि शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे

