*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत चोखोबाराय सार्थ गाथा चे अनावरण व संत तुकोबाराय शिळा मंदिराचे लोकार्पण*
मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा
ज्ञानदेवे रचिला पाया चोखोबा पायरी तुकोबा कळस, सर्व सकळ संतांनी समाजाला मार्ग दाखवून कधीही भंग पावणार नाही अशा अभंगाची रचना केली व त्या अभंगातून प्रेरणा व ऊर्जा मिळते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संत तुकोबारायांनी तेरा दिवस अनुष्ठान केले ती शिळा त्याग आणि वैराग्याची साक्ष आहे, गर्भ श्रीमंत तुकोबारायांनी आपली सर्व संपत्ती रंजल्या गांजल्या पीडितांच्या अडचणीत लोकार्पण केली, त्यांचे बोलणे चालणे वागणे यात फरक नव्हता ,जगाच्या कल्याणासाठी देह झीजवनारे ते प्रेरणादायी संत झाले.
संत चोखामेळा यांनी पाचशेपेक्षा जास्त अभंगाची रचना केली सरळ भाषेत अर्थासहित संत चोखामेळा सार्थ गाथा चे अनावरण माझ्या हाताने करण्याचे सौभाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मातृभाषा गुजराती असलेले मोदी जी मराठी भाषेचा मान वाढवताना म्हणतात" उंच नीच काही नेणे भगवंत " व जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
पुढे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे , न चुकता मोदीजींनी उच्चारले त्यावर सर्व वारकर्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
मोदीजींनी वैष्णव संवादाच्या सुरुवातीलाच
*नमो* सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, *नमो* सद्गुरु सच्चिदानंद रुपा
*नमो* सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती *नमो* सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या म्हणून सर्वांना नमन केले . व नंतर संत चोखामेळा अध्यासन केंद्र व विवेक व्यासपीठ यांनी निर्मिती केलेला संत चोखामेळा सार्थ गाथा चे विमोचन केले संत चोखोबा हे उपेक्षित संत होते शासनाने उशीरा का होईना दलित संत म्हणून त्यांची दखल घेतली पाच कोटी रुपये निधी मेहुना राजा जन्मस्थळ विकासासाठी मंजूर झाला पन्नास लाखांची कामे सुद्धा झाली. ऊस *डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा* या अभंगाचे रचियते चोखोबा जन्म स्थळ मेहुना राजापासून पंढरपूर पर्यंत व पंढरपूर पासून ते दिल्ली पर्यंत चोखोबाच्या ग्रंथांचा काव्याचा चरित्राचा प्रचार प्रसार होत आहे, देशाच्या सर्वोच्च पदी असलेल्या पंतप्रधानांकडून संत चोखोबांच्या गौरव व समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत असलेला दलित पिछडा गरीबांचे कल्याण हीच देशाची प्राथमिकता आहे असे नरेंद्र मोदींनी सांगितले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा यांचे संत चोखोबा यांचे मंदिरे मूर्ती गाथा बनत आहे याचा देऊळगाव राजा वारकरी समुदायाला सार्थ अभिमान आहे जय हिंद जय हरी .