वंजारी सेवा संघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी-प्रा.गजानन घुले यांची निवड.
नुकत्याच पार पडलेल्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये वंजारी सेवा संघाच्या नविन जिल्हा अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या. हि बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राहुलजी जाधवर सर आणि संघटनेचे राज्य कार्यअध्यक्ष मा.देवेंद्रजी बारगजे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सपंन्न झाली. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि गेली अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जबाबदारीवर काम करण्याचे संघटन कौशल्य असल्यामुळे वंजारी सेवा संघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी प्रा.गजानन घुले यांची निवड करण्यात आली आहे .या निवडीचे श्रेय ते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुलजी जाधवर सर मा.देवेंद्रजी बारगजे सर मा. सौ.सविताताई मुंढे मा.आश्विनजी सानप यांना देतात .या निवडीमुळे जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

