प्रभाग 5 मधील नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या व घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी

 प्रभाग 5 मधील नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या व घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी

तात्काळ पंचनामे करून सानुग्रह अनुदान देण्यात यावे  : छोटु कांबळे यांची मागणी *

विशाल गवई 

तालुका प्रतिनिधी चिखली 7083304124

चिखली : वादळी वाऱ्यामुळे काल रात्री दि.29 मे रोजी चिखली शहरातील प्रभाग 5 मधी येथील नागरिकांच्या घरावर  झाड पडून घरे व  वाहनांचे  अतोनात नुकसान झाले आहे.  भागातील इलेक्ट्रिक पोल्स पडल्याच्या, झाडे उन्मळून पडल्याच्या, अनेक नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या व घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. छोटु कांबळे यांनी नुकसानाची पाहणी करून चिखली विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.श्वेताताई  महाले पाटील यांना सर्व घटनांची माहिती दिली असून तहसिलदार  ,तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारसंघा_च्या_कर्तव्यदक्ष_कार्यतत्पर_आमदार

#सौ. #श्वेता_ताई_महाले #पाटील यांनी तातडीने घटनास्थळीं भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी, पडलेले इलेक्ट्रिक पोल्स लवकरात लवकर पुन्हा उभे करण्यात यावेत तसेच ज्यांच्या घरात पाणी घुसून अन्न धान्याची नासाडी झाली त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler