आज मा. ना. डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांची भेट घेऊन व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू करण्यासाठी निवेदन दिले

 आज मा. ना. डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांची भेट घेऊन व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू करण्यासाठी निवेदन दिले


विशाल गवई तालुका प्रतिनिधी चिखली 7083304124

 मा. डॉ राजेंद्र शिंगणे साहेब

अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथापालकमंत्री बुलढाणा जिल्हा.


विषय : लौकडाऊन नियमांमध्ये शिथिलता देऊन व्यावसायिक प्रतिष्ठानांना सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्या बाबत 



महोदय , 

              मागच्या दोन महीन्या पासून कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य  सरकारने अनेक निर्बंध घातले आणि जेव्हा त्याचाही उपयोग होत नाही असं लक्षात आलं तेंव्हा  जिल्हा प्रशासनाने कडक लौकडाऊन सुरू केले . आपल्या बुलडाणा  जिल्ह्यात सुध्दा १० मे पासून कडक लौकडाऊन सुरू आहे. यामध्ये काही मोजकेच जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता सर्व बंद आहे .  अर्थचक्र मंदावलं आहे म्हटल्यापेक्षा थांबलेलंच आहे. स्वाभाविक आहे की शेवटी जीवनच आवश्यक आहे , जीवनावश्यक काहीच नाही. 


                    आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी झालेली आहे .  याचा विचार करून आपल्या जिल्ह्यात लौकडाऊन शिथिल करण्यात यावं  . लौकडाऊन शिथिल करत असतांना काही निर्बंध घालण्यात यावीत  . यामध्ये लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, सभा मिटींगा , अंत्यसंस्काराचे कार्यक्रम यावर व ज्या ठिकाणी गर्दी होते अशा धार्मिक स्थळांवर काही काळासाठी अत्यंत कडक निर्बंध घातले गेले पाहिजे . अशा कार्यक्रमात गर्दी होऊन लोकांचा एकमेकांशी संबंध जास्त काळासाठी येतो आणि अशा ठिकाणी कोरोना पसरण्याची संभावना जास्त असु शकते . व्यवसायात अतिशय कमी संपर्क येतो आणि  संपर्क सुध्दा खूप कमी काळासाठी असतो. कुटुंबाचे अर्थचक्र त्याच व्यवसायावर अवलंबून असते. पर्यायाने त्याचा परिणाम राज्य आणि देशाच्या अर्थचक्राशी आहे. शेवटी कोरोनाची लढाई लढत असताना आपल्याला इतरही गोष्टींचा विचार करावा लागेल.  तसंही आज जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणारी गर्दी बघता खरोखरच ही गर्दी त्यासाठीच आहे की इतर कामांसाठी आहे अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. 

        १ जुन पासून लौकडाऊन हटवून कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना सह व्यावसायिक प्रतिष्ठान मर्यादित काळासाठी का असेना परंतु सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी ही विनंती . 


दिनांक ३०/५/२१

बुलढाणा

 आपला नम्र 

संजय गाडेकर

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler