शिंदी येथे रोहीणी नक्षञाच्या विजांच्या कडकडासह मान्सुनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा समाधान बंगाळे
सिंदखेडराजा तालुक्यातील ग्राम शिंदी येथे दि.30मे रोजी दुपारी 2:30च्या दरम्यान रोहीणी नक्षञाच्या पहील्या पावसाचे आगमन झाले.सलग 30 मिनिटे जोरदार पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे हवेतील ऊकाडा कमी होवून गारठा निर्माण झाला.
वैशाखी गरमीपासून थोडा दिलासा मिळाला तसेच बळीराजा सुखावला कारण या पावसाची शेतीच्या पूर्व मशागतीकरीता अत्यंतआवश्यकता असते.सद्य्या वातावरण पाहता पावसाची आणखी दाट शक्यता निर्माण झाली आहे