दिव्यांगाना प्राधान्याने लसीकरण करावे. प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले

 *दिव्यांगाना प्राधान्याने लसीकरण करावे. प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले* 

प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज

महाराष्ट्रतील सर्व दिव्यागाचे लसीकरण करुन शासनाने,कोरोना टेस्टींग उपचार व लसीकरण करण्यासाठी अपंगांना रांगेत उभे राहावे लागत आहे,त्याचे बेहाल होत आहेत तरी शासनाने आदेश काढुन जिल्हाधिकारी साहेबांनी  दिव्यांगाना योगय तो न्याय द्यावा.अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले माळी यांनी केली आहे.

दिव्यांग व्यक्तीची रोगकारक शक्ती सामान्य जनतेच्या तुलनेत कमी आहे,कोरोना विषाणुचा अधिक धोका असु शकतो.तरी मा ना श्री धनंजय जी मुंढे साहेब सामाजिक न्याय मंत्री यांनी दिव्यांगासाठी अनेक महत्व पूर्ण निर्णय घेतले आहेत तरी हा पण निर्णय घेण्यात यावा,कोरोना विषाणू चा दवाखान्यातील गर्दी पाहता अपंगांना धोका शकतो, सध्या कडक लॉकडाऊन असल्यामूळे प्रवासाची सुविधा नाही. तरी रांगेत उभे राहाणे हे अपंग व्यक्तींना शक्य नाही,मा साहेबांनी आठवड्यातून एक दिवस अपंगांना राखीव ठेवण्यात यावा असा निर्णय घेण्यात यावा.असे परिपत्रक काढून दिव्यांगाना न्याय द्यावा अशी नम्र विनंती मा ना श्री धनंजय जी मुंढे साहेब सामाजिक न्याय मंत्री यांना प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर  बाळू आमले माळी यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler