नेरी येथे बाजार चौकात कोवीड – 19 अंटीजन चीचनी
प्रतिनिधी_प्रविण वाघे :मो, 7038115037
नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतचे वतीने बाजार चौकातील व्यासपीठावर कोरोनाची शृंखला तोडण्याकरीता नेरी ग्रामपंचायतच्या वतीने आज बुधवार दि.9 जून रोजी कंँप लावून अँटीजेन तपासणी करण्यात आली.गावात विनाकारण फिरणारे, तसेच भाजीपाला विक्रेते,किराणा दुकानदार, स्टेशनरी दुकान संचालक,जनरल स्टोर्स धारक यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून कोवीड 19 एंटीजन चाचणी करुण घेतली आहे.एकूण 99 लोकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. सगळे नमुने निगेटिव्ह आले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच रेखा नानाजी पिसे ,ग्रा.प.कर्मचारी भिमराव गुरनुले, किशोर कामडी व इतर कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते:
