वाढदिवसाचे औचित्य साधत दोन नवतरुण युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश

 वाढदिवसाचे औचित्य साधत दोन नवतरुण युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश.

सातगाव येथील स्वप्नील घोरपडे, व विठ्ठल सोनूने जणुना यांचा मा.श्री. मनोजभाऊ दांडगे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश...     

                                                                      तालुका प्रतिनिधी चिखली 

विशाल गवई 7083304124


 आज दिनांक,५/०६/२०२१, वार , शनिवार रोजी, मासरुळ जिल्हा परिषद सर्कलमधील सातगाव येथील छत्रपती फ्लेक्स धाडचे मालक स्वप्नीलभाऊ घोरपडे व जणुना येथील विठ्ठलभाऊ सोनूने, या दोन तरुणांनी वाढदिवसाचे औचित्य साधत मा.श्री.मनोजभाऊ दांडगे (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल बुलढाणा) यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला आहे.. मनोजभाऊ दांडगे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याने प्रेरित होऊन, त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा जाहिर करून या तरुणांनी हा प्रवेश घेतला आहे. यावेळी मनोजभाऊ दांडगे यांनी या तरुणांचा वाढदिवस साजरा करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. यावेळी श्री.निलेशभाऊ देठे, (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुलढाणा) श्री.गजाननभाऊ पालकर,(राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष) सौ.निर्मलाताई तायडे,(तालुका उपाध्यक्ष महीला आघाडी) श्री.महेश हिवाळे,(राष्ट्रवादी युवक शाखाप्रमुख जणुना) प्रदीप नरोटे,(राष्ट्रवादी युवक उप शाखाप्रमुख जणुना) विनोद गायकी, विनोद तायडे, आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler