प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
प्रतिनीधी_प्रविण वाघे नेरी, 7038115037
ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेची गरज बघता आज दि. 5 जून रोजी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या पाठपुराव्याने चिमूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम क्षेत्र नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला १ अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान केली. तसेच, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
लोकार्पण प्रसंगी सर्वश्री वसंतभाऊ वारजूरकर, डॉ. श्यामजी हटवादे, राजूपाटील झाडे, राजूभाऊ देवतळे, मनोजभाऊ मामीडवार, रमेशजी कंचर्लावार, दत्तूजी पिसे, कन्हैयासिंगजी भोंड , मायाताई नन्नावरे, ग्रा.पं. सरपंच रेखाताई पिसे, गीताताई लिंगायत, ज्योतीताई ठाकरे, भारतीताई गोडे, संदीप पिसे, श्रीकृष्ण पिसे, नरेंद्र पंधरे, पिंटू खाटीक, श्रीकांत कामडी, THO डॉ. मेश्राम, आरोग्य अधिकारी डॉ. मगर, डॉ. वाघे, आदी उपस्थित होते,:
